Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[९९] श्री. ६ आगस्ट १७९५.
विज्ञापना ऐसीजे. नवाबाकडे सांगून पाठविलें कीं श्रीमंतांकडील आज्ञा आली आहे जे, अलीज्याह यांजकडील त्यांचे लष्करची अखबार कळली पाहिजे, यास्तव एक कारकून तुह्मी पाठवून अखबार लिहून पाठवीत जाणें. याप्रमाणें अजमखान व मुसारेमू याजकडेही कारकून अखबारीस पाठविणें ह्मणून आज्ञा आली. याविशीं काय इरषाद ?नबाब बोलिले कीं, बहुत बेहत्तर आहे, कारकून पाठवावा, ह्मणजे आह्मासही खबर कळत जाईल. त्यावरून अलिजाह यांस एक अर्जी लिहून नवाबास दाखविली. उत्तम आहे ह्मणोन बोलून कारकून लवकर पाठवावा असें सांगितलें. रहदारीचें एक दस्तक मागितलें तेंही दिलें. कारकून पाठवावयासी तयार केला. इतक्यांत काय कोणी सांगितलें. सरबुलतजंग यांजकडून नवाबांनीं रुका लिहून मजकडे पाठविला. त्यांत मजकूर कीं, तुमचेबद्दल खातर हजरतींनीं दस्तक रहदारीचे दिल्हे आणि कारकून पाठविण्याविशीं सांगितलें, परंतु राव पंतप्रधान यांची आमची दोस्ती, तेव्हां अखबारनवीस तेथें जाणें हें जाहिराण्यांत खुषनुमा दिसत नाहीं, आमचे येथें अखबार तेथील येत असते ती तुह्मास सांगत जाऊं, तुह्मी राव पंत प्रधान यांस लिहीत जावें, कारकून हरगीज पाठवूं नये. याप्रमाणें हजरतींनीं सांगितलें ह्मणोन रुका आला. तेव्हां कारकून पाठविणें ठीक नाहीं, ह्मणोन राहविला. क्षणिकप्रकृत झाली आहे. कोणताही भरवसा येत नाहीं. असा प्रकार आहे. रवाना छ २० मोहरम. हे विज्ञापना.
सदरहू अर्जी व दस्तक मवकूफ जाली सबब पाठविली नाहीं.