Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[९८] श्री. ६ आगस्ट १७९५.
विज्ञापना ऐसीजे. सिद्दी इमामखान यांचे येथें पैका सांपडला. दोन तीन लाखपर्यंत सर्व होईल. तो ऐवज व आणखी कोठील कांहीं आमद निघाली त्याजवर मोहरा करून नबाबांनीं आपलेजवळ नेऊन ठेविला. तो खर्चास देत नाहीं. तालुक्याची आमदनी हंगाम्यामुळें येत नाहीं. पेशगी कोणास कोणास फौज ठेवण्याकरितां रेणूरावजीनीं परवानगी घेऊन दिलें, तें सर्वांपासून माघारी मागतात. पैका मोटडींत भरून ठेविला आहे कीं काय, पैदा करून खर्च करावा, ऐसा राजे रेणूराव यांस हुकूम होतो. त्या फिकीरींत ते हैराण ! आज एक काम एकास सांगावें, दुसरे दिवशीं ह्मणावें कोणी तुह्मांस सांगितलें ? कां असें केलें ? याजमुळें बोलण्याचा भरंवसा कोणास येत नाहीं. मुळीं मुख्यस्थानीं जसें आहे त्याप्रमाणें प्रसर. एक नवाबाचे ताळे विज्यात आहेत. मसलहत सांगणार मर्जीकडे पहातात तसें बोलतात. मसलहतीवर कोणाची दृष्टी नाहीं. मर्जी हजरतीची खुष राहिली ह्मणजे कृतकृत्य ! अंज्याम कसा आहे, इकडे कोणी पहात नाहीं. आजचा दिवस टळला, पुढें पहातच आहों, असा क्रम चालला आहे. र।। छ, २० मोहरम. हे विज्ञापना.