Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[९७] श्री. ६ आगस्ट १७९५.
विज्ञापना ऐसीजे. इंग्रजांकडील पलटणें यांनीं आणविलीं आहेत. त्यास दोन पलटणें पूर्वीं आलीं होतीं त्याप्रमाणें येणार. पलटणीचा सरदार यास बंगाल्याचा हुकूम पोहोंचला तेव्हां ते तयारीस लागले. मोहरम झालियावर निघणार. ऐसें वर्तमान आहे. महिन्यानंतर किंवा दीड महिन्यानंतर येतील. पर्जन्यकाल आहे. कधीं येतील पहावें. मुसारेमू याचीं चार पलटणें कृष्णपार कडप्याचे बंदोबस्ताकरितां गेलीं. तिकडील जमीदारांचा बंदोबस्त न होतां तीं पलटणें इकडे बोलाविलीं. ते कृष्णा उतरून अलीकडे आले असें ह्मणतात. त्यास खर्चास ऐवज तिकडे लावून दिला होता तोही पुरता हातास आला नाहीं. येथे मुसारेमूस तनखा वसमतेवर दिल्ही. ऐवज वसूल होण्यासही कांहीं दिवस पाहिजेत. असें आहे. रेणूराव फौज जमा करण्यास डे-यास जाऊन राहिले होते. प्रस्तुत त्यांचें जाणें मौकूफ झाल्यासारिखें आहे. आपले घरींच आहेत. लष्करचें कुच शहराजवळून जालें. एक कोस निपाळ जागा पाहून राहिले. सात आठशें स्वार, हजार पायदळ आहे. भारामल लष्करांत असतात. घरासही येतात. कांहीं गाडद नवाबाजवळ आहे ती शहरपन्ह्याचे आणि शहरांत चौकीस असतात. आसदअल्लीखान फौज जमा करावयासी आपले तालुक्यास गेले. ते कृष्णा उतरून पार गेले ऐसें ऐकितों. कधीं येतील पहावें. आजमखान व घासीमिया व मुसारेमू आंदोलास आहेत. आंदोलाचे आणि हैदराबादेचेमध्यें वानरा आहे. तीस पाणी आल्यावर पलीकडे अटकतील. इकडून कुमक पोहचूं सकणार नाहीं. बेदराकडील उपद्रव हैदराबादेकडे लागण्याविशीं अडथळा नाहीं. यास्तव आंदोलांत कांहीं प्यादे ठेऊन सारेजण वांजरेचे अलीकडे संगारडीपेठेस यावें ह्मणून नवाबाची आज्ञा गेली. त्याजवरून ते नदीजवळ आले तों पाणी आलें. उतार मोडला. पाणी उतरलें ह्मणजे दों चहूं दिवसां अलीकडे येतील. याप्रमाणें येथील वर्तमान आहे. पुढें कसें होईल तें पहावें. र।। छ २० मोहरम. हे विज्ञापना.