Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[९६] श्री. ६ आगस्ट १७९५.
विज्ञापना ऐसीजे. खुफिया वर्तमान कळलें कीं, मुसारेमू याची अर्जी नबाबास आली त्यांत त्यानें लिहिलें आहे जे, हजरतींनीं अजमखान व घासीमिया व मलकईसा यांस व मला कार्यावर पाठविलें, परंतु कोणांत आळा नाहीं, कार्य पडल्यास हुकूम कोणी करावा, ऐकावें कोणी, याचा बंदोबस्त नाहीं, तेव्हां काम कसें घडेल, याजकरितां एक तोरा यावा, ह्मणजे त्याचे हुकुमानें क्रम चालेल, आळा बसेल. त्यावरून नवाबांनीं विचार ठरविला कीं, सिकंदरज्याहा यांस पाठवावें आणि पंतप्रधान यांस इतल्ला करून तिकडील फौज आणवावी. त्याजवरून सेवेसी लिहावयासी सांगितलें त्याप्रमाणें लिहिलें आहे. आज्ञा येईल त्याप्रमाणें बोलण्यांत येईल. र॥ छ २० मोहरम. हे विज्ञापना.