Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[९५] श्री. ६ आगस्ट १७९५.
विज्ञापना ऐसीजे. कोन्हेर बाबूराव ह्यास पाठवून द्या ह्मणून नबाबांनीं सांगून पाठविलें. त्याजवरून मशारनिल्हे पाठविले. त्यांजवळ नवाब बोलिले जे, शिकंदरजाहा साहेबजादे यास अलिजाह याजवर पाठवावे असें आह्मीं मुकरर केलें, राव पंतप्रधान याजकडील सरदाराशींही रफ्त आषनाईचा आहे, हरीपंडतजी कर्नाटकांत गेले होते त्यावेळेस शिकंदरजहाशीं यांच्या भेटी जाहल्या होत्या, रावपंतप्रधान व मदारूलमहाम यांच्या भेटीं षादीचे वेळेस पुण्यास गेले त्यावेळेस जाहल्या आहेत, त्यास रावजीस सांगून श्रीमंत व मदारूलमहाम यांस लवकर लिहून पाठवावें कीं तिकडील फौजा या कार्याकरितां लवकर निघाव्या, दहापांच कोशीं फौजा बाहेर निघाल्या ह्मणजे शिकंदरजहा यास येथून रुकसत करण्यांत येईल, प्रस्तुत जाहिराण्यांत सर्वांचे जबानंत् आहे जे श्रीमंतांचे आणि नबाबाचे चित्तांत सफाई पुर्ती नाहीं, त्यास अंतःकरणांतून सफाईच आहे, जाहीराण्यांत सफाई नमूद जाहली पाहिजे याजकरितां तिकडील फौजा निघून शिकंदरजहास सामील जाहल्या ह्मणजे जाहीराण्यांतही सफाई नमूद होईल, इंग्रजी जमैयत आणविली ती येत आहे, त्या अगोदर श्रीमंताकडील जमैयत येणें चांगलें, यांत दोस्तीची ऐक्यता विशेष दिसून येईल, यास्तव लवकर पत्र पाठवून उत्तर आणवावें, कोण सरदार मुकरर होईल याची इतल्ला करावी, जमैयत निघण्याची तरतूद केली अशीं पत्रें तुमचीं आलीं ह्मणजे येथून श्रीमंतांस व मदारूलमहाम यांस पत्रेंही पाठवूं. असें मशारनिल्हेबरोबर सांगून पाठविलें. त्याजवरून सेवेसी लिहिलें असे. त्यास, सरकारची जमीयत किती दिवसा निघेल, कोणते सरदारास आज्ञा होईल, याची सूचना येईल त्याप्रमाणें नबाबाशीं बोलण्यांत येईल. र।। छ २० मोहरम. हे विज्ञापना.