[९३]                                                                               श्री.                                                                          २ आगस्ट १७९५. 

विनंति विज्ञापना. राजश्री रेणूराव धोंडाजी याजकडून नबाबांनीं फौजेची नवनिगादास्त करविली होती. त्यास, हा समय नाजूक, दुतर्फा निगादास्त, तेव्हां लोकांचें चित्त स्वस्थ नाहीं. जेथें अधिक मिळेल तेथें जावें, हा इरादा. तथापि लोकही अधिकआगळे नाहींत. भरतीकरितां आजपावेतों अडीच हजार बार जमा झाले. व लोकांस जमीयत आणावयाकरितां मसादा दिला आहे. प्रस्तुत निगादास्ताकरितां राजेमजकूर बाहेर जाऊन राहिल्यामुळें मर्जी बहारम. चार लावणार ते रात्रंदिवस जवळ. याजमुळें राजेमजकूर यांस नवाबांनीं सांगितलें कीं, आतां निगादास्त पुरे करावी, व लोकांस मसादा ह्मणून ऐवज दिला आहे ते माघारी घ्यावा. त्यास, लोक ऐवज घेऊन ज्याबज्या गेले आहेत. राजाजीही शषोपंज्यांत आहेत. सांप्रत येथील फौजेंत भारामल व कलबाल्लीखान व सिताबराये हे हजरी गणतींत व तलावाछबिना वगैरेस नेमिले आहेत. राजेमजकूर शहरांत आपलें घरीं दोन दिवसांपासून आहेत. मुसारेमू व पागावाले वगैरे जमियतीनें आंदोल घेतले. पुढें बेदराकडे इरादा करितो. कांहीं कुमक पाठवावी ह्मणोन मुसामजकूर यांची अर्जी आली, त्यावरून राजाजीकडील नवनिगादास्त फौजेची रवानगी करणार आहेत. र।। छ १६ मोहरम. हे विज्ञापना.

छ २० मोहरम, मु।। भागानगर, रवाना टप्यावर.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries