Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[९१] श्री. २ आगस्ट १७९५.
विनंति विज्ञापना. रायेराया रेणूराव यांस जमियतसुद्धां बाहेर रहाण्याचा हुकूम झाल्याप्रों।। मशारनिल्हे बोहरियाचे बागापाशीं डेरे देऊन आहेत. येहतषामजंग नफरूद्दौला, व भारामल, दौलतखान, व मनमोहनराव पिंगळे, व सुलतानखान, सरमष्तखान वगैरे सरदार पांचसातशें स्वार व दोन हजार पैदल, याप्रमाणें जमीयतसुद्धां आहेत. राजाजी नित्य दरबारास नवाबाकडे येतात. केव्हां डे-यासही जाऊन राहतात. रात्रीं तलाव्यासभोंवते कोस अर्धकोस लोक स्वार वगैरे यांस ठेऊन, कोणी आले गेले मनुष्य यांची चौकशी फार आहे. शहरचे दरवाजे तीन चार खुले, तेथें गाडदी ठेऊन येणाजाणा-याची जुनरसी, बहुत आहे. हवेलींत बारगीर व भोवते गाडद्याच्या चौक्या ज्याबज्या याप्रों। बंदोबस्त आहे. र॥ छ १६ मोहरम. हे विज्ञापना.