[९०]                                                                               श्री.                                                                          २ आगस्ट १७९५. 

विनंति विज्ञापना. अलिजाहबहादूर साहेबजादे बेदरांत सदाशिवरड्डी व जमीयतसुद्धां आहेत. नबाबाकडील सरदार मुसारेमू व पागावाले घासीमीया अजमखान व इसामिया व जोतसिंग वगैरे संगारडीहून निघोन अंदोल येथें महासरा केला. जोगीपेंठ व अंदोल्याचे दरम्यान तलाव मातबर आहे. त्या पाण्यावर आंबराईत राहून मोर्चेबंदी केली. अंदोलचे गढींत सदाशिवरड्डीकडील पायदळ जमीयत तीन हजारपावेतों होती. त्यांची गोळी सुरू झाली. मुसारेमूबरोबर तोफा बारुद सरंजाम होता. दहा बारा दिवस गोळागाळी झाली. छ ११ माहे मोहरमीं रात्रीं, किल्ल्यांतील जमीयत निघोन, आसबाब जराबाजरा काढून घेऊन, सदाशिवरड्डीकडे गेले. गढी खाले जाली. मुसारेमू याचे लोक शिरून आंदोलचें ठाणें घेतलें. मुसारेमूची अर्जी नबाबास छ १२ रोजीं आली. हरकारे यांस इनाम दहा रुपये देविले. जोगीपेठ व रंगमा पेठ हीं दोन ठाणींही घेऊन, मुसारेमूकडील जमीयत त्या ठाण्यांत राहून बंदोबस्त जाला. याप्रमाणें वर्तमानें नवाबाकडे आलीं. र॥ छ १६ मोहरम. हे विज्ञापना.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries