Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

तेवढीच गोष्ट नवाब घेऊन बसले. तेव्हां त्यास ह्मटलें, नवाब बोलत अथवा मीरअलग बोलत, आपण उत्तर याप्रमाणें करावें, यांत किमपि संदेह मानूं नये, आदवनीचे जाबसालाचे त्यास इतके दिवस आदवनीचा फडच्या राहिला, सराकरांतून सावकारी ऐवज घेऊन त्याऐवजीं फौजेस देणें पडला, नुकसानीची काय वाट; व्याजसुद्धां आमचा फडच्या सर्व करून द्यावा, मग तुह्मी सालाबादची चाल ह्मणता ती ऐकूं, दोन्ही दौलती मोठ्या, यांत व्याज घेणें आणि देणें हे ठीक दिसत नाहीं, याजकरितां आजपर्यंत सालीना ऐवज द्यावा, पुढें चालते सालापासून मामल चाल असेल त्याप्रमाणेंच अमलांत येईल. याप्रमाणें उत्तर प्रतिउत्तरें झालीं. यावर रेणूरावजी ह्मणूं लागले कीं, जुजुवियातचा हिशेब व रुजुवात होणें आहे, याजकरितां कांहीं ऐवज या किस्तींत तहकूब ठेवावा, कांहीं पुढलें किस्तींत ठेवावा, ह्मणजे निर्वाह होईल. तेव्हां त्यांस ह्मटलें कीं, या किस्तास आणि हिशेबास काय संबंध? रुजुवातीचे आणि हिशोबाचे गोष्टीस नाकबूल कोणी नाहीं, एक एक करीतच जावें, रुजुवातीमुळें जिकडे फिरेल तिकडून फडच्या होईल हें करारांतच आहे, त्याअर्थी तूर्त चालते किस्तींत दिकत करूं नये, ही किस्त सालीना द्यावी, पुढें दोन किस्ती आहेत, अवकाश रुजुवातीस आहे, सहजांत गोष्ट आहे, यास दिकतीखालीं घालूं नये. तेव्हां रेणूरावजी ह्मणूं लागले कीं, श्रीमंतास मला निभावून नेणें आहे तर कांहीं ऐवज हिशेबाकरितां तहकूब ठेवावा, किस्तीचीं सालें वाढवावीं ह्मणजे मी नवाबजवळ बोलून निम्मा करून घेईन, मामलत आणखी सारा याचा फैसला करून देईन, असें मी श्रीमंताजवळ बोलेन, त्याप्रमाणें दोन्ही जाबसाल मी बोलल्याप्रमाणें निभावून देतों, एक गोष्ट माझी बोलण्यांतील आहे, आणि त्याचें वचन आहे, त्या गोष्टीचा भारम दारुल महाम यांवर आहे, याप्रमाणें आपण लिहावें आणि जवाब आणवावा, जर श्रीमंत मान्य करतील तर उत्तम नाहीं तर माझ्यानें निभावणार नाहीं, या कामांतून मी कदम काढीन, आपल्यावर हवाला घालून मीही एक पत्र देतों, बादजबर सात एक वेळ श्रीमंतांची नवाबाची मुलाखतही ठरवावी. याप्रमाणें बोलले. कसें लिहावयाचें तें सांगावें आणि पत्र द्यावें, असें बोललों. त्यास ते सांगतील तसें मागती लिहीन आणि पत्र त्यांनीं दिल्यावर पाठवून देईन. याचें उत्तर येणें तसे यावें. र।। छ २८ जिलकाद. हे विज्ञापना.