Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

                                                                       जुन सरकार राव पंत प्रधान.

[७]                                                                                  श्री.                                                                           १६ जून १७९५.

विज्ञापना ऐसीजे. रघोत्तमराव आले. त्याशीं बोलतां बोलतां बोलण्यांत आलें कीं, मुलूख घेण्याचा नाहीं, असा मदारुल्लगहाम यांचा करार ह्मणून नवाब बोलतात हें काय कोणी समजाविलें आहे, करार होणें तर रेणूरावजी आणि तुह्माशीं झाला असावा, त्यास कांहीं बोलण्यांत आलें आहे कीं काय ? तेव्हां बोलले कीं, याचें काय सांगूं, श्रीमंत आहेत, आतां विसरले असले तर यास आह्मीं काय करावें ? आतांचा समयच विचित्र, दौलत मंद यांशीं आमच्यानें सख्त बोलवतें कीं काय ? तेव्हां त्यांस ह्मटलें कीं, कराराची याद स्पष्ट आली असल्यास मग त्याचा संकोच तरी कां करितां? काय कसें झालें तें सांगावें. तेव्हां ह्मणाले, आपल्यास सर्व कळलेंच असेल. मीं ह्मटलें कीं, झालें असल्यावर न कळावें असें तर नाहीं, मगर फुरसत झाली नाहीं ह्मणून कळलें नाहीं, किंवा करार झाला नसेल. तेव्हां काय सांगावें ह्मणून तशीच गोष्ट राहिली. यांतील अर्थ समजत नाहीं ह्मणून पोटांत शिरून ममतेनें पुशिलें कीं, वास्तविक असेल तें सांगावें. तेव्हां मशारनिल्हे बोलले कीं, असें बोलणें झालें जे मषिरुलमुलूख यांस काढावें, मामलतीचा फडच्या वाजवी असेल तो करावा, याजवर राजश्री नाना बोलले कीं, ही गोष्ट नवाबानीं न ऐकिली आणि लढाईचा प्रसंग असल्यास आह्मांस फौजेचा खसारा पडेल याची काय वाट ? त्यास फौजेचा खसारा पडेल तो देऊं. याप्रमाणें बोलण्यांत आले, तेव्हां नाना बोलले की, खिसा-याचा पैका फार होईल, तुह्मांस देण्याची सोय होणार नाहीं, याजकरितां त्या ऐवजास कांहीं तालुका लावून द्यावा, इतकें बोलणें, खिसा-याचे बोलण्यास गीरसाहेब कबूल नव्हते, परंतु राजाजी ह्मणाले कीं, मी बोललों आहे, त्याअर्थी अंतर पाडूं न देईन, एवढें बोलणें, याशिवाय मुलुकाचें अक्षर नाहीं. त्यास ह्मटलें कीं, यादीवर करार करून तुह्मीं घेतला आहे कीं नाहीं? यादी ठरल्या: परंतु करार होणें राहिल्या, त्यांचे मसविदे गोविंदराव याजपाशीं आहेत, असें बोललें. तेव्हां त्यास ह्मटले, करार झाला नाहीं, तेव्हां मसविद्यास काय करावें ?