Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

(११) सरजे अजंनगावचे अहदनाम्यांत व सन १८०५ इसवीचे सालांतील अहमदनाम्यांत या अहदनाम्याप्रमाणें जे एक गोष्ट लबाड होत. नाहीं बहाल राहील व हर्दू सरकारांस कौलकराराप्रमाणें शेवट करणें लाजम आहे.

(१२) हा अहमदनामा बारा कलमांचा आजचे दिवशीं करार पावला. छ ५ माहे नवंबर सन १८१७ इसवी मुबीला छ २४ जिल्हेज सन १२३२ हिजरी, अश्विन व॥ ११, मुक्काम ग्वाल्हेर.

(३६) याप्रमाणें इंग्रजी सरकाराशीं तहनामा करून आपला बचाव करून राहिले. भोसले, होळकर, श्रीमंताचे मसलतीस अनुकूळ जाले.

(३७) सदाशिव माणकेश्वर भाद्रपद व॥ १३ छ २६ जिलकादी मृत्यु पावले. त्यांनीं दत्तक घेतले त्यांचे नांव लक्ष्मण सदाशिव ठेविलें.

(३८) श्रीमंतांची स्वारी पुण्यांत आल्यावर अल्पिष्ठन साहेब याची गांठ पडोन एकटेच श्रीमंतांचे व त्यांचें बोलणें जाहलें. त्यांत सफाईच दाखविली.

(३९) विनायक श्रोती व वामन भटजी कर्वे व शंकराचार्य स्वामी असे इंग्रजी पलटणात फितूर करावयासी मसलत श्रीमंतांस देऊन त्यांजपासून ऐवज घेऊन फितूर करावयास गेले.

(४०) दसऱ्याचे दिवशी श्रीमंतांची स्वारी सीमा उल्लंघनास गेली. तेव्हां स्वारी जातांना सालाबादप्रमाणें इंग्रजी पलटण व अल्पिष्टन साहेब सलामास उभे होते. त्याकाळीं साहेबाकडे पाहिलें नाहीं. बापू गोखले खवाशींत होते. नंतर साहेबांनीं घोडा पिटवून पुढें जाऊन फिरोन सलाम केला. नारो विष्णू आपटे आपली फौज व बाणाच्या कैच्या असेजमीयतींतील पलटणीची लयन उभी राहिली होती, त्यांचे अंगाजवळून जाऊं लागले. तेव्हां पलटण मागें हटली. नंतर फिरोन येतांना पलटणाकडून यावी, त्यावरी सलामीच्या तोफा माराव्या, अशी चाल असतां तिकडून स्वारी आली नाहीं. परभारें जातों ह्मणोन विठोजी नाईक याजबरोबर सांगोन पाठविलें.

(४१) गारपिरावर इंग्रजी पलटणाची छावणी होती त्याचे लगत अश्विन वा ४ बुधवारीं चंद्र १७ जिल्हेजीं २८-१०-१७ गोसावी वगैरे लोक उतरविले. त्याजवरून कर्णेल वेल यांणीं पलटणचे छावणींतून बाहेर काढून तयार होऊन बाहेर उभे राहून अल्पिष्टन साहेब यांजकडे सांगून पाठविलें कीं हर्दू सरकारची दोस्ती जाहल्यापासून सुरळीत चालत होतें, हल्ली दस्तूर सोडून काम होऊं लागले, याणें दोस्तींत खलेल येईल. दोन फौजा दोस्तांच्या असल्या तत्रापि केवळ जवळ उतरत नाहींत असा सांप्रदाय आहे, याजकरितां फौज तेथून काढावी. तशी मर्जी नसली, खमखाम बिघाड करावा अशीच मर्जी असली, तर तें तरी करावें. इंग्रजी सरकारचे सोजीर लोकांची पलटण मुंबईहून येत आहे तीं येऊन पोंचली नाहींतों पावेतों महाराजाचे फौजेची फत्ते जाहाली तर होईल असें सांगून पाठविले व संगमावरील मडमा वगैरे दापुडीस पाठविले. श्रीमंताकडून गोडीचेच बलावणें आले त्याजवरून मडमा वगैरे खटले संगमावर आणले आणि पलटणचे लोक संगमावर कांहीं जास्त आणवून बाकीची पलटण तशीच बाहेर मुक्काम करून राहिली; नंतर शनवारीं अश्विन वा ७ छ २० जिल्हेज सोजरांची  १-११-१७ पलटण मुंबईहून आली ते गारपिरावर उतरले. श्रीमंतांचे लोक जवळ आहेत, माणमाणसानिशीं खटला होईल, हें चांगले, नाहीं असें अल्पिष्टण साहेब यांणीं मनांत आणून पलटण गारपिरावरची छावणी सोडून खडकीनजीक अश्विन वा ९ सोमवारीं छ २२ जिल्हेजीं ३-११-१७ आणवून मुक्काम केला. दसऱ्याचे दिवशीं नारो विष्णू पलटणाचे जवळून जाऊं लागले, सबब लैन मागें हटली व गारपिराजवळ लोक गेले तेव्हां पलटण छावणींतून निघोन खडकीवर गेली त्याजवरून भिऊं लागले असा निश्चय श्रीमंतांच होऊन जे बादसल्ला देत होते त्याचे बोलण्यावर भरंवसा झाला.