Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
(३०) इंग्रजांशी बिघाड करावयाचा, आपण अनुकूळ असावें, असे सातारकर महाराज यांस माहुलीस आणोन बोलणें होऊं लागलें, आणि महाराजाचे कबिले वगैरे ठेवावयास वासोटयास जागा तयार केली आणि माहुलीस राहिले. पुढे कार्तिकस्वामीस जावयाचें असा घाट बोलण्यांत आणू लागले.
(३१) श्रीमंतांनी गणपतीचा उत्साह ही माहुलीसच केला. फौज जमवितात याजवरून त्यांचे मनांत कसें आहे ते समजावे याकरितां अल्पिष्टण साहेब याचे बोलणे पडलें की महाराजांची स्वारी पुण्यात येत नसल्यास आम्ही येथे येतों. त्याजवरून पुण्यास भाद्रपदमासी आले.
(३२) जनरेल इस्मित साहेब सरहद्देवर जाऊ लागले. त्याजबराबर २ हजार स्वार बाळाजी लक्ष्मण विंचूरकर यांचे पुतणे कुशाबा याजसमागमें पाठविले. इंग्रजी लष्कर दूर जाईल तितके चांगले असे समजत होते.
(३३) तहनामा झाल्यावर पोटसाहेब व मोरदीक्षित अल्पिष्टण साहेब याजवळ सफईची बोलणी बोलत असत. आंतून बापू गोखले यांचे अनुमतें इंग्रजांशी बिघाड करावा असा निश्चय करून बापू गोखले याजकडे मुखत्यारी दिल्ही. कोट रुपये तूर्त तयारी करितां गोखले याजकडे देविले. त्याणीं तोफा व बाण व फौजेची तयारी चालविली. व शिंदे, होळकर व भोसले, मीरखान वगैरे बंडवालेसुध्दा याशी आपले संमतात मिळवून घेऊन त्याणी इंग्रजांशी बिघाड करावा असा नकशा केला. धूळपास सांगोन आरमारचे डागडोजीचे काम चालविलें. व किल्यांवर भरत्या गल्याच्या वगैरे व शिबंदीच्या भरत्या केल्या. व गोविंदराव काळे व आन्याबा मेहेंदळे व दादा गद्रे व राघोपंत थत्ते वगैरे जे एकजात होते त्यांस लोभ दाखवून सलामसलत त्यांशी करूं लागले. खंडो गोविंद निसबत भोसले याजबरोबर मुधोजी भोसले यांस वस्त्रे इंग्रजी बहादूर याचे सल्याशिवाय गुप्तरूपे पाठविली. गोविंद केशव कारकून मीरखान याजकडे पाठविला, इतके कारस्थान माहुलीवरून सिध्द करून भाद्रपदमासी पुण्यास आले.
(३४) श्रीमंतांचे दुर्दैव उभे राहिले याजमुळे जे आचार कोणी केले नसतील तसे करू लागले. माहुलीचे वाडयात गंगाबाई xxxx करीण, विधवा बायको, तिचे अंगावर आपला मर्दानी पोषाख जवाहीर घालून तिला गादीवर बसवून आणि आपण खिजमतगार होऊन चवरी वारूं लागले. असे अनेक प्रकारचे व्यवहार करूं लागले. ते किती लिहावे !
(३५) शिंदे, होळकर, भोसले यांशी बाजीराव साहेब याणी कारस्थान केले. परंतु शिंदे यांच्या लगत इंग्रजी सरकारची मोठी फौज आली. तेव्हा त्यांणी श्रीमंतांचा नाद धरल्याने अगोदर मसलत आपल्यावर पडोन आपण बुडोन जाऊ. इंग्रजी सरकारचे लढाईचा अनुभव त्यास पहिला होता. याजमुळे तह करावा असा विचार करून शिंदे याजकडील मुखत्यार कपतान कलुष साहेब, यांचे विद्यमाने तहनामा झाला त्यातील हांशील :-
(१) उभयतां सरकारांपैकी हरएकांनी आपापली फौज व आपले षरीकाची आणखी पदरच्यांनी फौज पेंढारी अथवा जितके मुफसदांची जमियत आहे त्याजवर तैनात करून त्यास उतरले स्थळाहून बाहेर करून द्यावे, आणि त्यांचा जमाव फोडोन किरकोळ करावे, फिरोन त्यांचा जमाव होऊं न शके. ही गोष्ट अमलात आणावयाकरिता दोन्हीं सरकारच्या फौजा व उभयतांचे षरीकांचे फौजांसमेत पेंढारियांचा व मुफसदांचा पिच्छा करून हा मतलब पुरता न होय तो पावेतो बसून रहावे. याउपरि शिंदे करार करतात जे पेंढारी सरदारांचे कुटुंबांसुध्दा हस्तगत करण्याविशी सई करून कंपणी सरकारचे स्वाधीन केले जाईल.