Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

(१५) श्रीमंत याणीं शहर व सुभे अमदाबाद काठेवाडचे खंडणीखाते जितका श्रीमंताचा हिस्सा आहे त्याचा मक्ता गायकवाड यास सालीना साडेचार लक्ष रुपयांस ठरावून दिला होता. त्यांपैकी काठेवाड हाल्ली सातवे कलमाचे रुईने इंग्रजी सरकारांत दिल्हे आहेत, खेरीज करून श्रीमंतांचे सरकारांतून गायकवाड यास शहर व सुभे व अमदाबाद येथील सालीना साडेचार लक्ष रुपयांचा भक्ता करून देत आहे. शहर व सुभे अमदाबादची जमा अधिक आहे व गायकवाड याजवर श्रीमंतांचे सरकारचा दावा होता तो आजपासून सुटला. बाकी ऐवजीं चार लक्ष रुपये सालीना गायकवाड याजला ठरत आहे. याणें श्रीमंतांचे नुकसान होतें याजवर नजर देऊन काठेवाडचा मामला खेरीज करून साडेचार लक्ष रुपयांचा मक्ता ठरला आहे.

(१६) कर्नाटकचे जहागीरदारांचे बंदोबस्ताकरिता इंग्रजी सरकारांतून सहा कलमें तयार होऊन पेशजी श्रीमंताचे सरकारांत गुदरली आहेत. त्या कलमांची श्रीमंतांचे सरकारांतून कांही तबदील करून मंजूर केले तें कलम आता या तहनाम्यांतील कलमान्वये बहाल व बरकरार त्यास पेशजीचे यादीची नक्कल या तहनाम्याबराबर लागली आहे. जहागीरदारांचे हाजरीबरहुकूम व चाकरीचे मतीबरहुकूम तेव्हांपासून रदबदली बहुत पडली. त्यास हाल्ली श्रीमंत कबूल करिताहेत जे इंग्रजी सरकारचे सल्लेने हाजरीचा व चाकरीचा जबाब सवाल ठरेल त्याप्रमाणें श्रीमंतांचे सरकारांतून केले जाईल. त्यास त्या सरदारावर इंग्रजी सरकारचे मसलती शिवाय हुकूमत श्रीमंताचे सरकारांतून करू नये. सरदारांचे सनदेतील जमीन श्रीमंतांचे सरकारांत असल्यास ती जमीन त्या सरदारांस द्यावयाचे श्रीमंत कबूल करीत आहेत. माधवराव रास्ते यांची जहागीर सन खमसांत सरकारांत जप्त केली आहे. ती इंग्रजी सरकारचे शिफारशीवर नजर देऊन त्याजकडे बहाल करिताहेत. जसें पेशजी इंग्रज सरकारचे बहादरीनें त्याजकडे चालत आहे. त्याचप्रमाणे चालेल ह्मणोन श्रीमंत कबूल करीत आहेत.

(१७) मळेघाट व त्या इलाख्यातील जो मुलूक इंग्रजी सरकारचे मसलती शिवाय श्रीमंतांचे फौजेने सन इहिदे अशरचे सालांत घेतला आहे त्याणें मुशारीख यास बहुत इजा होते आहे. याजकरितां त्याजवर नजर देऊन मळेघाटांतून लष्कर काढून आणून तो मुलूक सोडावयाचा करार श्रीमंत करीत आहे. व याशिवाय सन इहिदे अशरचे सालांत आणखी मुलूख श्रीमंतांचे फौजेने घेतला असल्यास तोहि सोडून द्यावयाचा कबूल करताहेत. त्या मुलखावर श्रीमंतांचा दावा राहणार नाही.

(१८) हा तहनामा अठरा कलमांचा लिहिला असे. ता. १३ माहे जून सन १८१७ इसवी,  छ २६ रज्जब सन १२३२ हिजरी. मुकाम पुणें.
(१८) तहनाम्यातील सातवे कलमांत श्रीमंतांचे सरकारांतून इंगजी सरकारांत मुलूक लावून द्यावयाचा करार जाहाला आहे. त्याचा कागद ह्या तहनाम्याबराबर दिल्हा आहे असे कलमांत लिहिले आहे तो कागद. मुलूक लावून द्यावयाची बेरीज रुपये ३४००००० यासी कलमें :-

(१) तूर्त महाल हवाली करावे :- बेलापूर व वोटगाव प्रांत कल्याण व त्याचे उत्तरेस गुजराथ पावेतों सह्याद्रीचे घाटापासून समुद्रापर्यंत जितका श्रीमंतांचे सरकारच मुलूक व अंमल आहे तो दरोबस्त.

(२) प्रांत गुजरात येथील प्रांत अमदाबाद व उर्पाड व गायकवाड याजकडील सालीना खेरीज करून बाकी जितका श्रीमंतांचे सरकारचा मुलूक व अंमल आहे तो दरोबस्त.

(३) काठेवाडची खंडणी खेरीज करून ठराव रु. ४०००००
[ ४ ] तालुके धारवाड व कुशेगळ.
____