Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

(८) अलिजाबहादूर कंपणी सरकारचें वचनावर व स्नेहावर भरवसा ठेवून करार करतात. जे या मोहिमेचा कस्त होईतोपावेतो हाडे अशरचे किल्यात सरकार इंग्रजांचे ठाणे करून किल्ले मजकुरची निगाहबाजी सरकार इंग्रजांकडे गुजस्त करावी, व सरकार इंग्रजांचे अहालकर यखत्यार ठेवितात जे जो कारखाना व जकीरा आह्मास लागेल तो आह्मी हरदो किल्ले व मजकुरी ठेऊन किल्ले अशर येथे झेंडा व एक किल्लेदार व पन्नास शिपाई अलिजाबहादूर याणी ठेवावे. परंतु अशर व हांडे दोनीं मकाणांस सरकार इंग्रजांचा हुकूम चालेल. शिंदे यांचेकडील जकीरा व जंगी सामान हरदू किल्यात आहे त्याची मुखत्यारी इंग्रजबहादूर राखील. जो पावेतों किल्ले इंग्रजांकडे राहतील तो पावेतो जरी इंग्रजांकडे खर्च होईल किंवा नाश होईल तरी ही मोहीम जाल्यावर हिसेबाचे अन्वये जे मोल होईल ते शिंदे यांस पावते केले जाईल. किल्ले मजकूर इंग्रजाचे कबजात येतील तेव्हा उभयता सरकारचे कारादरंदाज जकीऱ्याचे असबावबे फेरिस्त करतील. सध्या शिपायांचे ठाणे हरदू किल्यात आहे त्यास अशरचे तैनातीचे लोक खेरीज करून बाकी लोकांनी बाहेर निघोन यावें. शिंदे याजकडील पागा वगैरे किल्ले मजकूरी आहे त्यांनी या अहदनाम्याचे सहावे कलमान्वये ठिकाणी रहावे. हरदू किल्ल्याचे जे महाल आहेत ते पहिल्याप्रमाणें शिंदे यांचे अंमलदाराकडे राहतील. इंग्रजाकडून त्यांचे संरक्षण होईल. महालाचा ऐवज तहशिलीचा त्या पैकीं दरोबस्त अथवा कांहीं केला, शिंदे यांची फौज इंग्रजी फौजे समागमें तैनात होईल त्याच्या खर्च जरूर होईल तरी या अहदनाम्याचे पाचवे कलमाप्राणें इंग्रजांचे हातानें खर्चांत येईल. या मोहिमेकडून स्वस्थ झाल्यावर त्याचा वसूल व खर्चाचा वाजवी हिशेब शिंदे यांस पावता केला जाईल. पेंढारी वगैरे यांचे मोहिमेकडून स्वस्थ झाल्यावर दोन्ही किल्ले महाल सुध्दा शिंदे यांचे स्वाधीन केले जाईल.

(९) उभयतां सरकारची मुख्य थोर मतलब कीं हे वर्तणूक लुटीची जात राहावी व उभयतां सरकारांस पूर्ण खातरजमा आहे कीं या धर्मकार्याचा शेवट नीट करण्यास, कदाचित, सर्व हिंदुस्थानीं रईसास सरकार इंग्रजास सामील करून घेणें जरूर होईल. यास्तव करार निश्चय ठरला कीं सन १८०५ इसवीचे सालांतील आठवें कलमांत इंग्रज सरकारास मनाई ते सरदार मजकुराशीं अहदनामा करण्यांत लिहिलेली आहे तें कलम रद्द होईल. व इंग्रज बहादूर अकत्यार ठेवितात जे उदेपूर व जोधपूर कोटा व बुंदी येथील राजे व इतर रईस नामांकित कितेक ग्वालेरीपासून चंबळपलीकडे मुलूख आपले हातात ठेवितात त्यांशीं करार करितील. व हे खेरीज या कलमान्वयें कोणे प्रकारें सरकार इंग्रजांची इतल्ला निश्चय ठरणें प्रांत माळवा व गुजराथ येथील राजे व रईसल व तालुकादार जे शिंदे यांजकडील नि:संशय आहेत त्यांशीं अहमदनामा करण्यास्तव होणार नाहीं व आणखी निश्चय ठरला कीं यांचा हुकूम पूर्वींपासून मामलेदार वगैरे यांजवर चालत आहे त्याप्रमाणें पुढें ही हुकम बहाल राहील व सरकार इंग्रज करार करितात जे राजे व सरदार सदरीं लिहिल्या अन्वयें उदेपूर वगैरे यांशीं वचनाप्रमाणें होय, तर खंडणी मुकरार शिंदे याजकडील राजाचे मुलखांत आहेत अखंड बहाल राहील. इंग्रजांचे अहालकर आपले विद्यमानें शिंदे यांचे सरकारांत दाखल करीत जातील, व आणखी शिंदे करार करितात कीं कोणें प्रकारें राजे व सरदार यांचे कार्यासंबंधीं सहसा दाखल करणार नाहीं.

(१०) हिंदूसरकाराशीं दुसरे जे सरकार वैरत्व किंवा पेंढारी वगैरे मुफसदांची हिमायत व कुमक करील येणें कडोन जर त्यांशीं युध्द करणें पडेल तरी इंग्रजी सरकार युध्द करून फत्ते पावेल, त्या संधानांत जर शिंदे यांजकडून अहदनाम्याचे कलमबंदीप्रमाणें अंमलांत येईल तरी शिंदे यास त्याचा नफा व फायदा व मुलखाचे बढोतीचे आगत्य राखोन स्नेहमुर्वतेचें मार्गे अम्मल करूं.