Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

(२) पेंढारियांची जमियत अलिजाबहादूर यांचे मुलकांत आणि नजीकचे प्रांतात राहिली आहे. यास्तव करार होत आहे की शिंदे यांचे मुलकांतील जे महाल व परगणे व तालुके पेंढारियांचे आहेत ते त्यांजकडून मोकळे होतांच शिंदे यांणी त्वरित आपले कबजात आणोन मुफसद व पेंढारी वगैरे यांस फिरोन प्राप्त न होता असा बंदोबस्त करावा. जे मकाण इतर रईसाचे पेंढाऱ्याचे हातात आहे, जर रईस पेंढारियांस आश्रय न देई व मिलाफ न करी, यथानशक्ति त्यांचे बीमोड करावयास व काढण्यास मेहनत करतील तरी ते मकाण त्याचे स्वाधीन करून रईसानें शरता लिहिल्याप्रमाणे न केल्यास ते मकाण अलिजाबहाद्दर यांचे स्वाधीन केले जाईल. तें मकाण सदरचे शर्ताअन्वयें शिंदे यांच्या कबज्यांत राहील. (३) अलिजाबहादर करार करतात जे पेंढारी वगैरे मुफसदांस, लुटारे यांस आह्मी व आह्माकडील सरदार पक्षपात व आश्रा देणार नाहींत व त्यांस खराब करण्यास व बीमोड करण्याविशीं आपले मुलखाचे अम्मलदार व फौजेचे सरदार याशी आज्ञा करू. जो कोणी सरकार आज्ञा अमान्य करील तरी त्याजकडून बहुत दंड घेतला जाईल. याप्रमाणें ताकीद केली जाईल. ऐशियास कोणी सरदार अथवा अंमलदार हुकूम न मानील तो शिंदे यांचा सरकश व कुंपणे सरकारचा दुश्मन. तो कर्तृत्वाप्रमाणे फळ पावेल.

(४) अलिजाबहादर करार करतात जे आमचे निजाबतीचे फौजेपैकी चांगली फौज स्वार पांच हजार पेंढारी व मुफसद यांचे पारपत्यास व स्थळांतून काढण्यास तैनात होईल ते इंग्रजी फौजेशी मिळोन राहील, इंग्रजी फौजेचे सरदारांचे विचाराप्रमाणे जे करणें ते करीत जाईल. व अलिजाबहादर आणखी करार करतात जे आपल्याकडील सर्वत्र फौजेचे सरदार व मुलखाचे अंमलदार आणि होळकर, इंग्रजी जमीयतीस जे गोष्टीचें, जे जिनसाचें अगत्य पडेल त्यापैकी जें होऊं सकेल त्याप्रमाणें खूप खरेदी करून आणून देण्यास तत्पर राहतील. यांत तीळ अंतर पडल्यास उभयतां सरकारचा दुष्मन आपले केलें फळ पावेल.

(५) अलिजाबहादर करार करतात की आपले सरकारची फौज इंग्रजी सरकारचे फौजेस सामील तैनात होईल. त्यांचा सरंजाम व घोडे जवान चांगले राहतील व फौजांस ताबेदार खर्च आमचे जातीचे व घरमंडळीचे व अहालकराचे सालीना सरकार इंग्रजांकडून नेमू करार आहेत. तीन वर्षांपावेतो सरकार दाखल न होतां इंग्रजी फौजेचे तैनातीचे सरदारांचे हातानें आमचे फौजेचे माहेवारीत खर्च होत असावे. व सरकार इंग्रज करार करतात जे ऐवज सालीना याबाबद पेंढारी वगैरे मोहिमेकडून स्वस्थ झाल्यावर फौजांचे माहेवारीचा खर्च जाऊन बाकी जो राहील, तो ऐवज शिंदे यांस पावता केला जाईल. व फौजांचे माहेवारीचे बंदोबस्ताकरितां अलिजाबहादर करार करतात की इकडील मामला जोतपूर बुंदीकोटाचे मुलकांत आहे तो दोन वर्षांपावेतो एकंदर सरकार इंग्रज याजकडे गुदस्त केला जाइल.

(६) अलिजाबहादर करार करतात जे बाहेरील स्वार व पायदळ व तोफखाना यांचा कुचमुकाम मोहिमे पावेंतों सरकार इंग्रज यांचे विचाराप्रमाणे करण्यास अंतर करणार नाही.

(७) कंपणी इंग्रज यांची जी फौज पेंढारियांचे मोहिमेस तैनात करतील व फौज तूर्त शिंदे यांचे सेवेंत सिध्द आहे ती पेंढारियांचे पारपत्य करण्यास्तव तहनाम्याचा शेवट करण्याविशीं बहुत तयार आहे. अलिजाबहादर करार करतात जे या मोहिमेपावेतो कदीम फौजा खेरीज सरकार इंग्रजांचे विचाराशिवाय सहसां ठेवणार नाही व आपलेकडील सरदारांस ताकीद की पेंढारी व दीगर मुफसदांची हिमायत किंवा मित्रत्व सहसा न करणें व त्यांचे फौजापैकी एकासहि आपले फौजेत सहसा जागा न देणे असे केले जाईल. जो कोणी सरकारची आज्ञा अमान्य करील तो सरकारचा बागी व कंपणीचा दुस्मान होऊन फळ पावेल.