Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
त्याजकरितां गादी कायम ठेऊन, पुढें त्यांचे हातून फिसालत न व्हावा याजकरितां वसईचा तहनामा कायम ठेऊन नवा तहनामा झाला. पांच हजार स्वार व तीन हजार पायदळ मदतीस देत जावें, असा बाजीराव साहेब यांचा पहिलाच करार होता. ती फौज कंपणी सरकारांतून ठेवावी असें होऊन फौजेचे खर्चास मुलुख लाऊन दिल्हा. तेव्हां पासून दोस्ती पहिल्या प्रमाणें चालली. नंतर पेंढारी चहूकडे रयतेस दरसाल उपद्रव करितात, त्यांत बाजीराव साहेब यांचे मुलखास बहुतच उपद्रव होता. याजकरितां पेंढारियांचा बंदोबस्त व्हावा अशी कंपणी सरकारांतून तजवीज जाहली. तेव्हां बाजीराव साहेब यांचे बोलणें पडलें जे पेंढारियांचा बंदोबस्त झाल्यानें आमची किफायत आहे, आह्मी ही फौज सामील देतों. असें खातरजमेनें बोलोन त्या बाहाण्यानें कंपणी सरकारचे आश्रयावर जो खजीना जाहाला होता तो ऐवज बाहेरचे सरदारास पाठवून त्यांस बिघडविलें व आपली फौज तयार करविली. कंपणी सरकारची फौज जवळ होती ती दूर जावी याजकरितां दोन हजार स्वार कंपणी सरकारचे फौजे बरोबर देऊन, फौज दूर गेली अशी संधी पाहून, एकाएकी कांहीं कारण व जाबसालाची तक्रार नसतां, फौज तयार करून चालून येऊन कंपणी सरकारचे फौजेशीं लढाई केली, व कोणत्याही मुलकांत चाल नाहीं तशी चाल करून इंग्रजी वकिलाचे बंगले व छावणी लुटून जाळली व कंपणी सरकारचे मुलुकाची रयत वाटसरू सल्याचा भरवसा धरून येत होते त्यांस धरून कैद केलें, व कितेक लुटले व दोन इंग्रजी सरदार मुंबईकडून येत होते त्यांस तळेगावाजवळ चोराचेंही पारपत्य करीत नाहींत त्या तऱ्हेनें, मारिलें. ते मारणार अद्यापी चाकारीवर आहेत. त्याजवरून बाजीराव साहेब यांचे हुकमाशिवाय मारिलें नाहींत असा निश्चय होतो व ज्या त्रिंबकजीनें गंगाधरशास्त्री याशीं मारिलें त्यास जवळ आणून कारभारांत वागवूं लागलें. त्याजवरून बाजीराव साहेब यांचें हुकुमाशिवाय त्रिंबकजी याणें शास्त्री यास मारिलें नाहीं. पहिल्यापासून लोक बोलतात तो मुद्दा शाबूत करून घेतला. व पेंढारी बोलावून मुलुख वाढवावा अशी तजवीज करूं लागले. या तऱ्हेचे दौलतदारीचे सांप्रदाय सोडून वर्तणूक करून कंपिणी सरकारास बुडवावें असें केलें. त्याजवरून कंपिणी सरकारांतून निश्चय झाला जे बाजीराव साहेब राज्याचे उपयोगी नाहींत, याजकरितां त्यांस बिलकुल राज्यांतून काढून कंपिणी सरकारांतून मुलुक व किल्ले काबीज करून अम्मल करावा. अशी तजवीज होऊन, एक सडी फौज बाजीराव साहेब याचे मागें रवाना करून, एक फौज किल्ले घ्यावयाकरितां जात आहे व दुसरी एक फौज अमदानगराजवळ येऊन पोंचली आहे, व एक मोठी खानदेशांत आली आहे, व जरनेल मनरो साहेब कर्नाटकाचा बंदोबस्त करीत आहे.व मुंबईकडून फौज येऊन कोकणचे किल्ले घेऊन त्या प्रांताचा बंदोबस्त होत आहे. आतां थोडके दिवसांत बाजीराव साहेब यांचा ठिकाण नाहीं असें होऊन महाराज छत्रपती सातारकर बाजीराव साहेब यांचे कैदेंत आहेत, त्यांस सोडवून घेऊन मोकळे करून, त्यांचे व त्यांच्या मंडळीचे छानछोकीकरितां कांहीं राज्य त्यांजकडे चालेल अशी तजवीज कंपिणी सरकारची होऊन, सातार किल्यावर महाराज यांचा झेंडा कायम करून, त्यांचे तर्फे लोक होते त्यांची खातरी केली आहे. त्यास, जो मुलुख महाराजाकडे होईल त्यांत न्याय इनसाफ व हुकमत व अम्मल ते करतील. कंपिणी सरकारांत मुलुख राहील तेथें कंपिणी सरकारचा अम्मल होईल. परंतु कोणाचे वतनास व इनामास व वर्षासनास व देवस्थानचे खर्चास व खयरातीस व ज्ञातीचे धर्मास खलेल न होतां वाजवी असेल तसें सुरळींत चालेल. व बाजीराव साहेब मक्तेदारास मामलती देत होते, ते महकूब होऊन कमावीसदार याजकडे मामलती सांगून जो वाजवी ऐवज असेल त्याचीच उगवणी होईल. कोणावर जुलूम जास्ती कांहीएक होणार नाहीं. येविशी कोणीही अंदेशा घेऊं नये. बाजीराव साहेब याजकडे जे चाकरी असतील त्यांनीं चाकरी सोडून आजपासून दोन महिन्यांत आपली घरीं यावें. जे कोणी न येतील त्यांचें वतन जप्त होऊन खराबी झाल्याशिवाय राहणार नाहीं. जमेदार यांणीं आपलाले परगण्यांतील जे कोणी बाजीराव साहेब याजकडे चाकरीस असतील त्यांची नांवनिशीवार याद तूर्त समजवावी. व चाकरी सोडून जसजसे घरीं येतील ते वेळेस समजावीत जावे व बाजीराव साहेब यांची कुमक करूं नये. व त्याजकडे वसूल एकंदर देऊं नये. दिल्यास सालमजकुरीं मुलखास उपद्रव लागला आहे. त्याची दरयाप्ती होऊन सूट मिळेल. बाजीराव याजकडे वसूल दिल्ह्यास तो ऐवज मजुरा न देतां दरोबस्त ऐवज घेतला जाईल. व जमीदार कुमक करतील व ऐवज देतील.