Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

(१९) वर लिहिल्याप्रमाणे हालीं महाल तूर्त हवाली करून येथील महाल मजकूर खर्च वाजवी वजा होऊन बाकी पैकी बेरीज ठरेल ती चवतीस लक्ष वसुली पुरवून चवतीस लक्षांचे भरतीची बाकी राहील त्यास जे महाल लागतील ते कर्नाटकपैकी कंपणी सरकारचे उपयोगी व सरहद साफ होई असे लावून द्यावे.

(२०) हाली महाल हवाली होत आहेत त्यांची पक्की बेरीज ठरोन भरतीस महाल कर्नाटकपैकी द्यावयाचे ठरतील तेथील मृगसालपासोन श्रीमंतांचे सरकारचे मामलतदारांनीवसूल घेतला असेल तो तहनाम्याचे नववे कलमाप्रमाणें कंपणी सरकारांत परत द्यावा.

(२१) महाल हाली हवाली होत आहेत त्यांची पक्की बेरीज ठरावयाकरितां दफ्तराचा अजमास वगैरे कागद वीस वर्षांचे पलीकडील खातरजमेमोफक जे लागतील ते आजपासून पाच रोजी आणून द्यावे. याप्रमाणे तहनामा ठरला.

(२२) तहनाम्याचे भरवश्याकरितां त्रिंबकजीची मुलें माणसें कैदेंत ठेविली.

(२३) वकील व अबकरनीस व बाहेरचे सरदार जवळ होते त्यांस येण्याविषी पत्रें पाठविली.

(२४) पुण्यास बाहेरचे सरदारांचे वकील होते त्यांस निघोन जावे ह्मणोन ताकीद केली.

(२५) त्रिंबकजीची मुलेंमाणसें कैदेंत ठेविली व वकील अकबरनीस आणविले त्याजवरून तीन किल्ले श्रीमंतांस इंग्रजांनी परत दिल्हे.

(२६) श्रीमंतांनी किल्ले इंग्रजी सरकारांतून माघारा दिल्यावर जवाहीर व पैका वगैरे चीजवस्त सिंहगड, रायगड वगैरे किल्ल्यांस रवाना केली व वाडयातील देव व थोरली स्त्री वाराणशीबाई रायगडास पाठविली. धाकटी स्त्री सरस्वतीबाई व आपासाहेबांची स्त्री दोघी उभयता जवळ राहिल्या.

(२७) तहनामा झाल्यावर श्रीमंतांची स्वारी पंढरपुरी गेली. तेथून सालाबादप्रमाणें पुण्यास यावें तें न करता, श्रावण मास अधिक आहे सबब कृष्णा स्नानाचें निमित्ताने माहुलीस जाऊन तेथे राहिले.

(२८) श्रावणमासाची दक्षणा पुण्यात चौथाई दिल्ही.

(२९) पेंढाऱ्याचे बंदोबस्ताचे बोलणें बोलावयाकरितां सरजन मलकमसाहेब चिनापट्टणाकडून हैदराबादेवरून डाकेवर श्रावणमासी पुण्यास आले. त्यांस रामचंद्रपंत करंदीकर सामोरे गेले. स्वारी श्रीमंतांची पुण्यास येत नाहीं याजकरिता मलकम साहेब माहुलीस गेले. श्रीमंतांजवळ बोलणें झालें की पेंढारचे पारपत्यास लाटसाहेब जातीनें आले व कर्नाटकांतून जनरेल इसलाफ साहेब येत आहेत, फौज पेंढाऱ्यावर जाईल तेव्हा निघून दुसरे मुलकांत शिरतील याजकरितां आपले मुलकांत येऊ न पावता अशा बंदोबस्ताकरितां घोडनदीची पलटणे सरहद्देवर जात आहेत. व श्रीमंतांनी आपलेकडील फौज द्यावी असें बोलणें पडलें. फौज अधिक ठेवावी असा श्रीमंतांचा मनसोबा होता व ठेवीतच होते. याजकरिता सरहद्दीवर आपली फौज आह्मीहि ठेवितो असा रुकार देऊन उघडपणें फौज जमा करू लागले. मलकम साहेब पुण्यास येऊन मोर दीक्षित यांचे घरी मेजवानी घेऊन माळव्यांत गेले.