Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
(२) वसईचे मुक्कामी १९ कलमांचा तहनामा व पुणे मुक्कामी सात कलमांचा जाहला आहे. त्यातील कलमांस हल्लीचे तहनाम्यांतील कलमांने व्यत्यय न येईल ती कलमें बहाल आहेत.
(३) वसईचे तहनाम्यांतील अकरावें कलमांत लिहिले आहे जे फिरंगस्थानाचे कोणी दवलतदार इंग्रजी सरकाराशीं लढत असतील त्यांची रयत श्रीमंतांचे सरकारांत लयेऊन इंग्रजी सरकारचे नुकसानीची तजवीज करतील त्यांस श्रीमंत आपले मुलखांतून दूर करतील. हल्ली श्रीमंतांचे सरकारांतून करार होत आहे जे फिरंगस्थान येथील दुनयापैकी कितीएक सरकारवाले आहेत, त्याजकडील रयत कोणी श्रीमंतांचे सरकारचे मुलखांत आल्यास इंग्रजी सरकारचे इतल्याशिवाय त्यांजला जागा देणार नाहीं
(४) वसईचे तहनाम्याचे सतरावे कलमांत श्रीमंतांचे सरकारांतून करार केला जे इंग्रजी सरकारचे इतल्याशिवाय कोणी एक सरदाराशीं कांहीएक जाबसाल कोणताही सुरू करणार नाही. त्या कलमाचे मजबुदीकरिता श्रीमंत करार करतात जे सरदार व दवलतदार यांजकडील वकील व अकबरनीस व हर कोणी कारकून व कामदार आपले सरकारांत ठेवणार नाही. जो काहीं जबाब सवाल करणे असेल तो इंग्रजी सरकारचे वकिलाचे मार्फतीनें करू. पहिले तमाम मराठे सरदारांध्यें इलाखा होता तो सुटला व त्या सरदारांवर हरतऱ्हेचा दाया आदाया असेल तो सोडून दिल्हा. तुंगभद्रा व नर्मदेध्ये व मोंगलाई मुलकाचें पश्चिमेस जे सरदार श्रीमंतांशी रुजू आहेत त्यांजवर श्रीमंतांचा दाया हक्क असेल त्यास वर लिहिलें आहे त्याणें खलेल येणार नाहीं. महाराज करवीरकर व सावंतवाडीकर यांजवर श्रीमंतांचे सरकाराचा दावा नाहीं. शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड यांचा जो मुलूक वगैरे दाया तुंगभद्रा व नर्मदेच्या मध्ये व मोगलाई मुलकाचे पश्चिमेस इलाख्यांत असेल त्याजवर श्रीमंतांचे सरकारचा दावा नाही.
(५) वरचे कलमांत मराठे दवलतीचे सरदारांवर दावा असेल तो श्रीमंताचे सरकारांतून सोडून दिल्हा, त्यात गायकवाड यांजवरहि जो दावाहुकुमत कोणतेहि तऱ्हेचा असेल तो सोडून दिल्हा असें लिहिलें आहे; व वसईचे तहनाम्यांत चवदावे कलमांत श्रीमंतांचे सरकारचा गायकवाड याजवर कागदपत्राच्या रुईनें जो जावसाल असेल त्याची दर्याफ्ती इंग्रजी सरकारचे मारफतीनें होऊन गायकवाड याजकडे जे लागू होईल त्याप्रमाणें फडशांत येईल, असें कलम लिहिले आहे. त्यांस कागदपत्राचे रुईने श्रीमंताचे सरकारचा दावा आजपर्यंत जो लागू होईल तो बहाल आहे. त्यास, श्रीमंत करार करीत आहेत की गायकवाड बशर्त सालदरसाल चार लक्ष रुपये द्यावयाचे कबूल करीत असल्यास हाही दावा सुटला, कबूल करीत नसले तरी गायकवाड याजवार श्रीमंतांचे सरकारचा दावा जो असेल तो वसईचे चवदावे कलमाप्रमाणे फडशा होईल. शिवाय कोणताहि दावा राहिला नाही.
(६) पुण्याचे मुक्कामी सात कलमें करार झाली. त्यांस चवथे कलमात करार की लढाईचे वेळेस पांच हजार स्वार व तीन हजार पायदळ व तोफा व सामान लढाईचे द्यावें व शिवाय तामगदूर आणखी फौज द्यावी असें लिहिले आहे. तें महकूब होऊन त्या ऐवजी करार जाहाले जे श्रीमंत करार करतात की पांच हजार फौज व तीन हजार पायदळ व तोफखाना व सामान याचा खर्च देऊं, ह्मणजे पुण्यांतील चवथे कलम दूर जाहाले. लढाईचे वेळेस मुलकांत जितकी फौज तामगदूर तयार होईल ती द्यावी असा श्रीमंतांचा करार आहे तो बहाल आहे. व इंग्रजी सरकारची सहा पलटणें तैनाती आहेत त्या शिवाय लढाईचे वेळेस आणखी फौज पैदा होईल ती करून द्यावी असा करार आहे तो बहाल आहे.