Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

आह्मी आपले मिसलीत तयार होऊन उभे होतांच, ते दिवशींचा समय सर्वांस विचित्र भासला. उपप्लव नानाप्रकारचे होऊ लागले. आकाशमार्गी घंटानाद व पक्ष्यांचे शब्द भयउत्पन्न होऊं लागले. दिशा, आकाश, रक्तवर्ण पाहून आह्मी श्रीमंताजवळ गेलों. तेथेंही सर्वांची क्षीण चित्ते देखिली. भाऊसाहेब, धैर्याचे मेरू, आह्मांस आज्ञा करिते जाले कीं, याप्रसंगी सर्वप्रकारे आह्मांस तुह्मी वडील आहां, तीर्थरूपापासून सांभाळ केलात, आजचा प्रसंग आमचे समाप्तीचा आहे, ब्रह्मलिखित निश्चय असे, त्यास, दोन प्रकारे संकट मोक्षमार्गास पाशवत् जाहले आहे, हे आपणा वेगळे मुक्त करून मनोरथ पूर्णकर्ता कोणी दिसत नाहीं, संकटे कोणती ह्मणाल तर चिरंजीव विश्वासराव यांस मातापिताविरहित हा प्रसंग व दुसरे आमचे कुटुंब समागमे, त्यास, स्त्रीचा वध करावा तर आमचा क्षात्रधर्म नव्हे, ब्राह्मणास स्त्रीहत्या वर्ज्य, त्यांणी सहगमन करावें, तर आह्मी धारातीर्थी देह ठेवणार, याचें फळ होणार नाही, पुढे संबंध दुष्टाशी, या संकटापासून आह्मास दूर करून मोक्षमार्गाचा पंथ आमचा शुध्द निर्मळ केला पाहिजे, याजकरितां उभयतांस तुह्मी आपलेजवळ घेऊन एका बाजूवर जावें. अशी शास्त्रवत् उत्तरे केली. तेसमयीं ही वचनें, तो प्रसंग वैरियासही पाहावणार नाही. एक घटकापर्यंत आह्मी मूर्छागत जाहलों आणि श्रीमंत भाऊसाहेब यांजवळ जाऊन समजाविले कीं, हे कर्म किं निमित्य करिता ? बाहेर आणीक लोकांस कळता फौज चकित, नाकर्ती होईल. असें आह्मी खंबीरता बोलतां आपण बोलले कीं, अंदेशे क्षणश: काय करावें ? तूर्त तुह्मी कांहीं न विचारितां उभयतांस घेऊन जाणें. प्रसंग फार समीप आला आहे ह्मणून बोलिले. आह्मी उत्तर केले कीं, असे कर्म काय ह्मणोन ? असत्या आयुष्यास मृत्यूचा अंगिकार करिता. आपलेजवळ सर्व योग्यता आहे. द्रव्य, फौज, कांही प्राणांपेक्षा अधिकोत्तर नाहीं. पेशजी पठाणलोक आपलेकडून कितेक वेळा सलूख करीत असतां तुह्मी न केला. बरें ! असो ! सांप्रतहि सामोपचार करतों. आह्मांस आज्ञा जाहाली पाहिजे. बोलणे ऐकोन क्षणभर स्तब्ध राहून वचनोत्तर निष्ठुरतेचे दिल्हें कीं, नेमणूक कर्तव्य विधि पूर्वीच करून गेला, षण्मास जाणतो, तो प्रसंग सांगावयास येत नाहीं, अन्यथा करणार कोण आहे ?