Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
इभ्रामखान गाडदी यांणी अर्ज केला कीं, आज निकड फार होईल, पठाण फार पोळले आहेत, कसूर होणार नाहीं, साहेबीं एक ठिकाणी चाल होतांच धैर्य धरून असावें. अशा विचारांत आहे तों तोफांचा मार चुकवून पठाण येऊन उभे राहिले. त्यास, पुढें चाल करावयाचा लाग दिसेना. फौज जैशी तैशीच तयार आहे हें पाहून अबदलअल्ली फिरोन बेहिंमत जाला. आघाडीस होते ते पिछाडीस जाले. पातशाहाजादी मलकाजमानी तयार होऊन अवघ्यांचे मागें होती. पठाण फौजेची अधैर्यता पाहून चिंतागत जाली कीं, मी यांजला बहुत प्रकारें तेज दिल्हें, परंतु योग अघटित आहे, सांप्रत त्यांणीं युध्यही न केल्याचा इलाज कांही चालत नाही, मैदानची लढाई असती तर होणार समर्थ मानून घोडे चालवितें, आता कितेक प्रकारे जंगी सरंजाम गलिमाचा, व दुसरा, खंदक. यास काय करतील हे मनांत आणून चिंतार्णवी पडली. हातिणीवर अंबारीत स्वारी होती ती खाली डेरा उभा केला. उजूतवाजू ह्मणजे हातपाय धुवून तमाम चकताईत ह्मणजे मोंगल यांचे पातशाहीत; औरंगजेब, महाबली, पातशाहा, पुण्यश्लोक, अवलिया, अवतारी पूर्वी होऊन गेला, त्यांचे स्मरण निश्चयपूर्वक करून मान्यता केली. त्याचे पातशाही निशाण जामदारखान्यांतून काढून बिनियावर चढवून सेवकास आज्ञा केली कीं, दरोबस्त फौजेचे अघाडीस घेऊन जाणें. सेवकानें हुकुमाप्रमाणे काठीसहित निशाण, फौजेचे पुढे येऊन उभे करून रोविले. सुजायतदौला व अबदलअल्ली वगैरे मुख्य सरदार यांस तब्रुक, उदी वस्त्रें, मिठाई व अंगारा प्रसादिक पाठविला. प्रसादस्पर्शनी अधैर्य अधीरपणा होता तो सर्वांचा जाऊन, पुन्हां शत्रुर्दनाविशी निष्ठा दृढतर जाली. तम सरदार एकत्र होऊन स्वतां इमानें केलीं. सत्तर हजार फौज एकदिल करून, फरा बांधोन, आह्मांकडील फौजेवर पाहू लागले. व आह्माकडील फौजेस ते दिवशीं तेज अधिक, प्राणघातक, असे दिसोन आलें. दिशा, आकाश, पृथ्वी, शोभाविशोभा, उत्कर्ष जाली. पूर्वी कृष्णावताराच्या समाप्तीत भिल्लबाणें चरणकमळीं निमित्य करून निजधाम करिते जाले. तसे श्रीमंत विश्वासराव व भाऊसाहेब संनिध करून मायावंत केले. आज आमचे आयुष्य तडीस विसरोन दूर ठेविले. पंचप्राण एकत्र एकविचारें निशीथ मृत्यु अंगणी उदित केला. परंतु धारातीर्थी प्रायश्चित्तस्नान करून मार्गावलोकन मात्र आहे. स्वर्गाचे ठायीं देव, गंधर्व यांची विनें कौतुकार्थ दाटली. ही आज चिन्हें, परिच्छिन्न आपण दृष्टांत अवलोकिला. श्रीमंत बाईसाहेब ही वार्ता ऐकोन परम महार्णवी पडली. रायाचे ललाटप्रदेशीं धरून रुदनास प्रारंभ केला. परस्परे श्रमीं जाले.