Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
उभयतां बोलू लागलें कीं, तुह्मी आह्मास बुडविलें. अशी परस्परें उत्तरे जालीं. आता आह्मी जातों. अशा कजियांत चारशे माणूस उभयतांचे कामास आले. ते समयीं मलकाजमानी दरम्यान येऊन उभयतांची स्थिरता केली आणि तेथेंच मुक्काम करविला. फौजेत कांही जीव राहिला नाहीं. कित्येक लोक जखमी व एक हिस्सा चांगले. गलीम जेर होतां दिसत नाहीं. आता विचार काय ? कसे करावें, कोणीकडे जावें, व लोकांस मुख काय ह्मणोन दाखवावें, जहराचे प्याले घेऊन मरावें. अखेरी जमा. सारांश, मोठे मोठे अमीर, अबदलअल्ली, सुजायतदौला यांणीं नेमणुकी कितीएक फकीर फकरा लोक बोलावून, ईश्वरप्रीत्यर्थ दानधर्म मृत्युमार्गाचा संग्रह जो करावयाचा तो करून, रात्रीचे ठायीं विषप्रयोग करून अखंडदडायन व्हावें, अशी शरम गालिब जाली. ही खबर मलकाजमानी बादशाहाजादीस आली. तों स्त्रीधैर्य पूर्वीपासून महत्, असें शास्त्रीं पुराणीं प्रमाण, ते दृष्टोत्पत्तीस आले, की सरदार विषाचे प्याले घेऊन मरतात, हें आश्चर्य करून, आपण पडदा लाऊन, जातीनें सुजायतदौला याचे डेऱ्यास आलियाची बेअदब माफ करून, डेरादाखल जाली. सुजायतदौला यांणी खुरनिशात बजावून, हात बांधून, उभे राहिले. काय आज्ञा ह्मणोन अर्ज केला. पातशाहाजादीनें प्रत्योत्तर तेज:पुंज दिल्हें कीं, तुमचे पिते मनसूरअल्लीखान वगैरे अमीर होते, त्यांचा पराक्रम या दक्षण या हिंदुस्थान दोन मुलकांत जाणतात. त्याची अमर्यादा तुह्मी करून त्याचे यशचंद्री कालिमा का लाविता? आणि वैरियासी विन्मुख होऊन विषप्रयोग करितां, हे अनुचित. पहिलेच असें. किंवा कितेक विचार कळला असतां, तर हा विचार तुह्मांस दिला नसता. पुरुषजन्मास येऊन सार्थक काय करावें. आदौ, मृत्यू, आज अथवा शतवर्षप्रमाण. दुसरें, येश कोणे प्रकारे मृत्यु, द्रव्य, राज्य, कबूल करून संपादावें. तिसरे, ज्यानें जो शब्द गोविला, तो प्राणांतिक अन्यथा होऊ नये व अन्य मुखीं देऊ नये. चवथें, जो व्यापार जाणावा, त्याची अभिमानता असावी. पांचवी गोष्ट धर्मवासना असावी. हें पुरुषजन्माचे सार्थक. तेंच तुमचें कफन असतां, तुमचें ठायीं प्रसंगी एकही प्रकार दिसोन न आला. ही गोष्ट कोण जाली ? ठिकाणीं जहर खाऊन मरावें, जगांत अपकीर्ति करावी, हें मरण कबूल केलेच आहे. तेव्हा असें कां मरावे ? शत्रुसन्मुख घेऊन मेल्यास काय चिंता आहे ? जहर खाऊन मरावें यांत वैकुंठप्राप्ती व तरवारेचे धारेनें मरावें यांत नर्क, असें कांही आज तहकीक तुह्मांस कळले असेल कीं काय? सर्व गोष्टीनें तुह्मी पढेफाजल आहां व सर्व किताब जाणून अकलपुरे आहां.