Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१७३] श्री. २५ मार्च १७२१.
वेदमूर्ति राजश्री धर्माधिकरणी व उपाध्ये मौजे आंबवली त॥ खेड गोसावी यांसि :-
सेवक कानोजी आंगरे सरखेल दंडवत सु॥ इसने अशरीन मया अलफ. रामजी चोरघा, बापूजी पारठा याचा लेक व मानाजी आंबवला हरदूजण यांही माहाद माहाला नाहावी, मौजे गांवतळें, याणें आपलें नांव पवार ह्मणोन सांगितलें, याजकरितां न कळतां सोयरिका केल्या. त्याउपरी नाहावी ऐसें दखल जाहलें. यावर हरदूजणांस पश्चात्ताप होऊन, बायका दूर करून, प्रायश्चित्त घ्यावें, येविशी हुजूर रसालगडचे मुक्कामी येऊन विनंति केली, अपभ्रवशें शरीरसंबंध केले. याकरितां हरदूजणाच्या बायका दूर करून प्रायश्चित्ताची आज्ञा केली असे. श्रीभीमाशंकर व श्रीमहाबळेश्वर व श्रीहरिहरेश्वर येथील यात्रा करवून यात्रा करून आल्यावर यथाविध प्रायश्चित्त देऊन, शुध्द करणें. जाणिजे. र॥ छ १२ जमादिलाखर.