Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१७२] * *+ *++ *+++ *++++ *+++++होळकराची थैली
पठाण यांणी दुसरे दिवशीं सावर धरून, कुंजपुरा घेऊन, आमचे फौजेभोवतां घेरा दिला, लढाईचा प्रसंग सोडिला. आमचे फौजेंत पहिले दिवशी साफी करून, पांच सात कोस जाऊन, तमाम कही वगैरे सामान पंधरा रोजाचें भरून आणिले होतें. तेव्हां रुपयास अन्न तीन शेर जाहलें. त्याजकडील पठाण लोक सभोवतें काम करीत, इकडील लष्कराची कही पाहून करीत. हत्ती, घोडे, व उंट व बैल ह्यांचे मृत्यू शेकडों पातले. माणसांची गणती काय ? तोफखान्याचे गोळे भारी केले. परंतु त्यांनी गोळेयांचा जिकडे हल्ला(तो जागा) सोडून दिल्हा; आणि हजार दोन हजार पठाण दावघाव पाहून अचानक येऊन पडोन, गाडदी वगैरेयांस जखमी करून, व कांही ठार मारोन माघारे जाईत. यामुळे इभ्रामखान गाडदी याणें तमाम फौजेस ताकीद केली की, लष्कराभोवती खंदक खणावा.गाडदी यांणी आपले सरहद्दीपुढें एक भाला खोल खायी खंदली. तेव्हा पठाणाचा लाग कमी येण्याचा पाहिला तेव्हा तेहि चोहोंकडून संकटांत पडले. पन्नास हजार खासे लोक त्याचे होते त्यांपैकीं पंचवीस हजार राहिले. आणि पुढे लढाईनें गलीम जेरदस्त होतां दिसत नाहीं, लढाई टाकून जावें तर मुलकांत काय सांगावे ? मालकाजमानी व सुयाजतदौला यांस पैका मागावा तर ते ह्मणतात कीं, आमचे काम फत्ते करून द्यावें आणि जो पैसा आह्मी कबूल केला तो घ्यावा, असा अघटित विचार जाहला. त्यास काय करावें ह्मणोन सुजायतदौला व मालकाजमानी व अबदलअल्ली वगैरे सरदार एकत्र होऊन तह केला कीं, कोणेही प्रकारें गलीमाशी सलूख करावा, सांप्रत कोणीं हरविलें नाहीं व कोणी जिंकिलें नाहीं, ऐशियास सामदाम करून यश संपादावें. ह्मणून अवघियांचे चित्तांत येऊन विचार केला आणि सांडणीस्वार याजबरोबर पत्र पाठविलें कीं, परस्परे भांडोन मुलूख बुडवावा यांत विशेष काय आहे ? जें जाहलें ते उत्तम, सांप्रत तुमचा सलूख हाच कीं सुदामतप्रमाणें जे ठिकाणी तुह्मी अंमल करतां ते ठिकाणी करावा, दिल्लीपतीची मर्यादा तुह्मीं व आह्मी रक्षावी. याप्रमाणे लिहिलें आले. ती पत्रें श्रीमंत र॥ भाऊसाहेबांजवळ दाखल जाहालीं. भाऊसाहेबीं तमाम सरदार लोक इभ्रामखान गाडदी यास बोलावून आज्ञा केली कीं, लढाई महकूब ठेवावी, व पत्रें आली होतीं तीं अवघ्यासं वाचून दाखविली, आणि विचारलें की याचें उत्तर काय लिहावें, आपल्या ठिकाणी लढाईची स्थीत येत नाहीं.