Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
मी स्त्रीनें युक्त विचार सांगावा, हा पदार्थ नाही. तुमचे विचारास जसें येईल तसे करावें. ह्मणोन तरवार वोढून त्याचे स्वाधीने केली कीं, तुह्मी आपले हातें माझी गर्दनछेद करावा, नंतर तुह्मांस विहित कर्तव्य असेल ते असो. अशी मलकाजमानीची उत्तेजनवचनें ऐकोन, जसे पंकार्त ह्मणजे चिखलानें भरोन आर्त जाले ते गंगाप्रवाहीं निर्मल होतात, तसें सुजायतदौला कुबुध्दिमलें व्यापिले होते ते मलकाजमानीचे वचनगंगोदकजलें प्रक्षाळून पूर्वीपेक्षा सुशोभित जाले. आणि ते समयीं शाहाजानी नौबत केली. चित्तांत धैर्य धरून अबदलअल्ली यास बोलावूं पाठविलें. तो त्यांणीं एकमेकांशी जावयाची सिद्धता करून, प्रस्थान करावयाचे विचारांत आहेत, इतकियांत सुजायतदौला याजकडील बोलावणारा मेला. त्याणे सांगितलें कीं, पातशाहाजादी व सुजायतदौला एके ठिकाणी आहेत, तुह्मांस बोलाविलें आहे. अबदलअल्ली याणें उत्तर केलें कीं, आह्मी निश्चयांत आहों. ह्मणोन मृत्यूवधूलग्नसाहित्य दाखविले. बोलावणारा चाकर माणूस होता. त्यानें उत्तर केले कीं, हे कर्म काय करिता? आपली चिंता सर्व ईश्वरास पडली आहे. गलिमास नसती सलाबत जाली, गलीम तळ व तोफखाना व बुणगे सोडून पळतात, तमाम सरदार पळाले, मूळ करारास आले, याजवर नोबतखाने सुरू करून सुजायतदौला सिध्द जाहाले, साहेबीं चलले पाहिजे, सांप्रत मरत्यास मारणें कठीण नाहीं, ऐशियांत जाऊन तमाम फौज कत्तल करावी. ऐसें ऐकोन जयश्री वस्त्रें भूषणें सुशोभितशी अनृत वार्तिकवचनें सत्य मानून नौबत करविली आणि आपण मलकाजमानीजवळ येऊन खुरनिशात केली. बोलावणारा वार्तिक अबदलआली याचे येण्याचे अगोदर पुढें येऊन सांगितलें कीं, मी याप्रें॥ बोललों आहें, त्यांप्र॥ च त्याशीं उत्तरें करावीं, दुसरें बोलल्यास विचार अनुकूल पडणार नाहीं. याणेंही अबदलअल्ली येतांच निरोपी बोलिला त्याप्रे॥ उत्तरें केली. गहजब भासला. गोरवर्णीस जसे तेज तसेच तेंचक्षणी पुढें होणार याप्रे॥ पुनरावृत्ति बुध्दीस धैर्यसंचार जाहाला. आणि कितेक लोक शिपाई बोलावून सज्ज करून रात्रक्रमण केली. प्रात:कालसमयीं हुंकार देऊन तमाम गळित फौज त्या मुक्कामी टाकून निवडक सत्तर हजार स्वार पठाण शाबुदींत निघाले. तों इकडे आह्मांस बातमी आलीं, श्रीमंत भाऊसाहेब व इभ्रामखान गाडदी यांणी बरा पराक्रम करून तळ उठवून माघारे लष्करात आले. नौबती सुरू करून पांच लक्ष रुपये धर्म केला. दुसरे रोजीं चार घटका दिवसास बातमी आली कीं, पठाण सावर धरून येतात. असें ऐकतांच पूर्ववत्प्रमाणे मिसला तमाम शिबंदी पाठवून फौज सिध्द करून उभे राहिले.