Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[१७१] पे॥ छ १८ जमादिलावर श्रीगणराज. ९ मार्च १७५७.
सेवेसी गोपाळराव गोविंद कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. सरकारची खंडणी सालदरसाल दोन हत्ती व चार घोडे बिदनूरकर देत असतात. त्याप्रमाणें सालमजकुरीं घ्यावे. त्यास संस्थानिकापासी चार हत्ती चांगले आहेत, त्यापैकी दोन हत्ती घ्यावे व घोडे चार येणें ते संस्थानी वर्षास चांगले देत नाहीत. घोड्याची रीझ सरकारात कशी आहे तें तुह्मास ठावकीच आहे. घोडे चार चांगले घेणे. अरबी घोडे चांगले घेणें. तुमची नजर तुह्मी घ्यालच. ह्मणोन आज्ञा केली. ऐशियास, बिदनूरकर सर्वप्रकारें पदरी पडले आहेत. स्वामीचे मर्जीशिवाय वर्तणूक करणार नाहींत. दोन हत्ती चांगले व चार घोडे सालाबाद देत असतील त्याप्रमाणें सालमजकुरीं जे उत्तम असतील तेच घेऊन सेवेसी पाठवितों. राजश्री नरसाप्पा नाईक उदैक बिदनुरास जाणार. ते जाऊन हत्ती घोडे चांगलेच पाठवितील. आह्मी बसवलिंगाप्पाच्या डे-यास गेलों होतों. दोन घोडे नजर त्यांनी दिल्हे. मध्यम आहेत. विदित होय. हे विज्ञापना.