Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ समान अर्बैन मया व अलफ, सन ११५७
फसली, अव्वल साल छ २५ जमादिलावल,
२५ मे १७४७, वैशाख वद्य १३ शके १६६९.

छ १० रमजान ( ५ सप्टंबर १७४७) स्वारी सिध्दटेकास जाऊन आज रोजी निंबाळकर यास भेटून परत आले. छ १७ सवाल (११ अक्टोबर १७४७) किल्ला घेतल्याचे वर्तमान आलें, होळकर याजकडून. छ १ जिलकाद (२५ अक्टोबर १७४७) नारो अपाजी खिरे यास पुणें मुक्कामी सुभ्याची दिवाणगिरी सांगितली. छ १ जिलकाद (२५ अक्टोबर १७४७) शिंदे होळकर यास हिंदुस्थानांत जाण्याची परवानगी झाली. छ ६ जिलकाद (३० अक्टोबर १७४७) किल्ले हरिश्चंद्र फत्ते झाल्याचे वर्तमान आलें. छ २४ जिलकाद (१७ नोव्हेंबर १७४७) पर्वती येथील महादेव रुप्याचा वजन ६७३४॥। व गणपति ६८६॥। पार्वती वजन १२४५५ येणेंप्रमाणे मूर्ति तयार झाल्या. छ १८ जिल्हेज (१० डिसेंबर १७४७) स्वारीस निघाले ते मौजे पिंपरखेडे परगणे छ ४ सफर रोजी (२४ जानेवारी १७४८) गेले. तेथून श्रीमंत हिंदुस्थानांत गेले. भाऊसाहेब यांची प्रकृति बिघडली. सबब दादासाहेबसुध्दां परत पुण्यास आले. श्रीमंत गुजराथेंतून नेवळीचे स्वारीस गेले. छ १८ जमादिलावल (६ मे १७४८) माधवसिंग सवाई जयसिंगाचा पुत्र मौजे बागथडी, प्र॥ तोडा, प॥ जयनगर येथें श्रीमंताया भेटीस आला. भेट झाली. त्याचे डे-यास गेले होते. मुलूख देऊन रवाना केले. आणि माघारे उलटून अखेर साली उज्जनीवर आले. छ २ जमादिलाखर (१९ मे १७४८) माणिकगड घेतल्याची खबर आली. छ १ रज्जब थेऊरास (१७ जून १७४८) परत आले. छ २ रज्जब (१८ जून १७४८) भाऊसाहेब यांचे पुत्राचें बारसे झालें. छ ९ जमादिलाखर (२६ मे १७४८) भिऊबाई बारामतीकर यांचे घरी अबाजी नाईक यास दिली होती ती मयत झाली. बाळाजी विश्वनाथ याची मुलगी इचीच बहीण अनुबाई इचलकरंजीकर यांचे घरी व्यंकटराव नारायण घोरपडे यास दिली होती. पागा मुक्काम कवडी येथें नवा बाण स्थापन केला, छ २ रबिलाखर (२१ मार्च १७४८). खासा स्वारी देहेर व खानदेशपर्यंत गेली. तों नासरजंग व कारभारी रामदासपंत चालून आले व लढाई झाली. नंतर अशीउंबरीवर फाल्गुन मासी (मार्च १७४८) तह होऊन पुढें हिंदुस्थानास गेले. खासा व बाबा यांचे कारभारांत पेंच पडू लागले. भाऊसाहेब लहान असता कारभार करू लागले. अहमदशा अबदली इराणी बादशाहानें दिल्लीवर स्वारी केली तेव्हां दिल्ली बादशाहा महमदशाहा याने आपला पुत्र अमदशा यास पाठविलें. त्याने याचा पराभव करून काबुलापर्यंत मागें हटविले. नंतर तो दिल्लीस माघारा येत असतां याचा बाप महमदशाहा मयत झाला होता. मग त्याचे जागी या अहमदशाहाची स्थापना सन १७४८ एप्रिल महिन्यांत झाली. त्यावेळेस निजामउन्मुलूख यास वजीर होण्याविषयीं बहुत आग्रह केला. परंतु यानें वृध्दापकाळामुळें तें काम करण्याचे कबूल केलें नाहीं. तेव्हां तें वजिराचें काम अहमदशाहा बादशहानें सफदरजंग औंदचा नबाब यास दिलें. निजामउन्मुलूख तारीख २९ जून सन १७४८ रोजीं ब-हीणपुरास मयत झाला. या वेळेस याचें वय १०४ वर्षांचे होते.