Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ सल्लास सलासीन मया अलफ, सन ११४२ फसली,
अवलसाल छ ११ जिल्हेज, २५ मे १७३२
ज्येष्ठ शुध्द १२ शके १६५४.

जंजिरें येथे सिध्दीचा अंमल होता. त्या सिध्दीस मोंगलांनीं याकूब असें पद दिलें होतें. त्याशी व मराठ्याशी निरंतर युध्द होत असे. व तो शाहूचे मुलखांतही लूट वगैरे करीत असे. यास अवरंगजेब याणें दिलेला मुलूख होता तो मराठ्याचे हाती लागू दिला नाहीं. यास्तव याजकडील जंजिरा प्रांत व रायबाग किल्ला, सन १६९० इ॥ साली शाहूमहाराजास व त्याची मातोश्री येसूबाई यांस कैद करून दिल्लीस नेलें, तेव्हा तोही मोंगलाचे हाती लागला. व तो सिध्दी जंजीरकर याजकडे दिला होता, तोही घ्यावा असें शाहूहाराज व त्यांचे दरबारचे लोक इच्छित होते. जंजीरकर यास कपट करून जिंकावा अशी प्रतिनिधींनी मसलत केली. ती अशी की, त्या सिध्दीजवळ त्याचा विश्वासू याकूबखान मुसलमान होता. त्याशी वश करून ठरविलें की सिध्दीचें अधिपत्य नाहीसें झालें असतां, कांही किल्ले आह्मास देऊन बाकीचें राज्य तूच सांभाळ. ही मसलत शेवटास न्यावयाकरितां महाराजानी प्रतिनिधीबरोबर फौज देऊन कोंकणांत पाठविलें. त्या वेळेस यशवंतराव महादेव यासही महाराजांनी पाठविलें होतें. परंतु त्यास कांही प्राप्त न होतां सिध्दीपुढें कांही चालेना. सबब प्रतिनिधी तेथून निघून गोवळकोट किल्ल्यामध्ये गेले. तेथेंही जंजीरकर याणी लोक पाठवून छापा घालून प्रतिनिधीची दुर्दशा केली. याच सुमारें जंजिरे येथील सिध्दी गादीवर बसलेला मयत झाला. त्यास सहा पुत्र होते. वडील सिध्दी अबदूल जंजि-यात राहिला. त्याचे पाठचा अबदूल रहिमान मुर्दादफनास जंजि-याबाहेर आले. बाकी त्यापेक्षां धाकटे सिध्दी सबान व सिध्दी आरबाब व सिध्दी रहयान व सिध्दी याकूब असे चौघांनी विचार करून वडील सिध्दी अबदूल यास जिवें मारून आपण जंजि-यात राहिले. सिध्दी अबदूल रहिमान बाहेर आला होता, त्यानें चार बंधूंनी दगा केला हें ऐकून जंजि-यात न जातां राजपुरीस राहिले. त्याजकडे यशवंत महादेव याणीं संधान लावून त्यास वश करून ठेविला होता. हें वर्तमान याकूबखान मुसलमान यास कळताच तो सिध्दी रहिमान याचा पक्ष स्वीकारून त्याचे विचारें शाहूमहाराजाकडे मदत मागितली. त्यावेळेस बाजीराव माळव्यांतून येत होता. त्यास मदतीकरितां जाण्याविषयी आज्ञा देऊन शिवाय रिकामे लष्करी जे होते त्यांसही मदत करण्यास आज्ञा केली. त्याप्रमाणे बाजीरावसाहेब पेशवे छ २२ जिल्काद रोजी (२६ एप्रिल १७३३) ह्मणजे अखेर सालीं अजमासें वैशाखांत जंजि-याचे स्वारीस निघाले. यापूर्वी झालेली वर्तमानें : सरकारवाड्याचे ह्मणजे शनवार वाड्याचे कोटास आरंभ झाला, श्रावण व॥ ५ (३० जुलै १७३२). रविलावल महिन्यांत रामचंद्र बाजीराव मयत झाले. छ ११ जमादिलावल रोजी (२० अक्टोबर १७३२) चिमाजी अप्पा हिंदुस्थानचे स्वारीस निघाले. व बुंदेलखंड वगैरे ठिकाणी गेले. छ १६ जमादिलाखर त॥ २७ रमजान (२४ नोव्हेंबर १७३२-३ मार्च १७३३) निजामुन्मुलुकाचे भेटीस स्वारी गेली होती. छ १६ जमादिलाखर साता-यास जाऊन छ २७ रमजान परत पुण्यास आले. छ १० रमजान (१४ फेब्रुवारी १७३३) पो चापानेर सर केल्याची खबर आली, नजीक मईंजगावं, परगणें वोडसे.