Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ इहिदे शितैन मया व अलफ, सन ११७० फसली,
अवलसाल छ १९ सवाल, ४ मे १७६०,
ज्येष्ठ वद्य ५ शके १६८२.

पर्जन्यकाळ शांत झाल्यावर सदाशिवराव यानीं दिल्लींत अलमगीर याचे जागीं शहाअलम याचा पुत्र अलीगोर ऊर्फ मीरजमाल तक्ताधिपति करून दुसरा शाहालम असें नांव ठेविलें व सुजायतदौला यास वजिरी दिली व नारो शंकर यास राजेबहादर असा किताब देऊन त्यास तेथें बंदोबस्तास ठेविलें. नंतर कुंजपुरा कोट आहे तो तोफा लावून पाडून तें स्थान घेतलें. इतक्यांत अबदाली यमुना उतरून अलीकडे अक्टोबर सन १७६० चे २५ तारखेस आला. नंतर दुसरे दिवशीं युध्द झालें. त्यांत मराठे मसलत करीत कीं, उद्यां एकदम मुसलमानांवर हल्ला करावा. होळकर याचें ह्मणणें असें न करितां धान्यादिकांचा तोटा करावा. त्याजवर इब्राहिम गार्दी याचें ह्मणणें तोफांचे हल्ले करावे असें पडलें. होळकर याचें ह्मणणें अमान्य केलें. इतक्या मसलतींत मराठ्यांचें लष्कर मागें हटत पानपतावर आलें. गारद्याचे मसलतीनें भाऊनीं आपलेसभोंवतीं खंदक ८ हात खोल व ३३ हात रुंद खणिला. इतके अवसरांत अबदाली जवळ येऊन उतरला. मुसलमानांचें सैन्य ४१८०० स्वार व पायदळ ३८,००० व तोफा ७७ होत्या. मराठ्यांकडे ५५,००० स्वार व १५,००० पायदळ व शिवाय पसाराबुणगे दोन लक्ष होते. याप्रमाणें लष्कर असतां गोविंदपंत बुंदेले यास शत्रूकडील धान्यादिकांचा नाश करण्यास पाठविलें. त्यास अबदालीचे सरदारांनीं डोकें कापून घेतलें. सन १७६० चे नवंबर तारीख २९ पासून आरंभ होऊन तारीख २३ दिसेंबरपर्यंत झालें. रुपयांच्या थैल्या दिल्लीहून कितीएक स्वार येत होते, ते रात्रीची वाट चुकून अबदालीचे लष्करांत जातांच त्यांस मारून तें द्रव्य घेतलें. तारीख २४ दिसेंबर रोजीं नजीबउद्दवला व बळवंतराव गणपत यांचें युध्द झालें. बळवंतराव मेहेंदळे गोळी लागून ठार झाले. बायको सती गेली, छ २८ रबिलाखर (७ डिसेंबर १७६०). नंतर कांहीं दिवस युध्द होत असतां भाऊसाहेब यांचे लष्करांत धान्याचा तोटा पडून पौष शुध्द ८ रोजीं सरकारकोठींतील धान्य सर्वांस वाटून दिलें. ते पोटभर जेवले. पोष शुध्द ८ रोजी पुढें तोफा व जबूरे व जेजाला व बाणदार व इब्राहिमखा पलटणीसुध्दां होते. त्यामागें दमाजी गायकवाड, त्यामागें वरकड सरदार व जनकोजी शिंदे यांचें लष्कर व उजवे बाजूस व डावीकडे इब्राहिमखान मदत सदाशिवरावभाऊ.