Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
१ यशवंतराव होळकर हिंदुस्थानांतून फौजसुद्धां पुण्यानजीक येतां च श्रीमंताची लढाई होऊन श्रीमंत निघोन कोकणांत गेले. सुवर्णदुर्ग येथें जाऊन श्रीमंत जहाजांत बसून वसईस जाऊं लागले तेव्हां सर्वांस फौजसुद्धा निरोप दिल्हा तेव्हां आम्ही निरोप घेऊन देशीं वाईस येऊन नंतर पुण्यांत श्रीमंत अमृतराव साहेब यांची पूर्वी कृपा संपादन केली होती त्यावरून येऊन भेटलों नंतर येथील रंग ठीक दिसेना सबब विसापुरी मुलेंमाणसे होती तीं आणून मुलेंमाणसेंसुद्धां लोहोगडास गेलो. मागें होळकरांकडील हरीपंत भावे वाड्यांत येऊन राहिले होते त्यामुळें वाड्याची वगैरे खराबी बहुत जाली पुढें श्रीमंत बाजीरावसाहेब इंग्रज बहादूर यांस घेऊन पुण्या आले मिति ज्येष्ठ शके १७२५ तों होळकर व अमृतराव साहेब पूर्वी च निघून गेले श्रीमंतास आम्ही घाटाखालीं भेटून बरोबर पुण्यास आलों. भेटीसमई सारंगी घोडी श्रीमंतास नजर केली. मुलेंमाणसें लोहगडीं होती ती वाईस आणून ठेविली. नंतर पुढें दंगा निवारण जाल्यावर पुण्यास आणिली नंतर पुढें धान्याचा दुष्काळ बहुत पडला त्यामुळें ऐवज बहुत खर्च जाला.
१ गोविंदराव तात्या यांस पुत्र व कन्या
१ कुसाबाई
१ काशीबाई
१ मनुबाई
१ नीलकंठराव यांचा जन्म वैशाख शुद्ध १४ शके १७३७
१ श्रीमंत बाजीरावसाहेब याबरोबर स्वा-या बहुत करून मेहनत हि फार केली परंतु त्यांचे विचारास न येतां सदाशिव माणकेश्वर कारभार करीत होते त्याणीं निमे सरंजाम राहिला तो स्वारासुद्धां जप्त केला मिति शके १७३३ त्यामुळें बहुत खराबीस आलों इनामा खेरीज सरकारी इलाखा कांहीं राहिला नाहीं.
१ श्रीमंत अमृतरावसाहेब याणीं पेशजी केवडयाचे विहिरीकडील जागा घेऊन दुस-यास दिल्या त्यांची नावें
१ विठ्ठलपंत लघाटे
१ बापू चिटणीस
----
२
१ बाळोजी कुंजर याणी गंजीची जागा पुलाजवळील होती ती जबरदस्तीनें घेतली.
१ हरीपंतनाना याचें दुसरें लग्न स्वसंतोषें शके १७३४ बाळाजीपंत पटवर्धन याची कन्या केली नाव सौ गंगाबाई ठेविलें.
१ हरीपंत नाना यांस पुत्र व कन्या
१ प्रथम स्त्रीस यमुनाबाई
१ दुसरे स्त्रींस चिरंजीव माधवराव बापू यांचा जन्म आषाढ वा। १० शके १७४१ विभक्त जाल्या नंतर
-----
२
१ सौ कुसाबाई लग्न माघ शु।। १५ शके १७३४ नारोपंत दातार पेणकर याचे पुत्रास दिल्ही; तात्या श्री महायात्रेस गेल्यानंतर मागें चिरंजीव नानानीं लग्न केलें समारंभ बहुत चांगला जाला.
१ सो काशीबाई यांचे लग्न माघ वा २ शके १७३६ कुशाबा सोमण तळेकर याचे पुत्रास दिल्ही. तात्या महायात्रेहून आल्यानंतर सोमणाकडील मांडवपर्तणाचे दिवशी उपाध्ये याचे दक्षणेवरून चिरंजीव नानाचा कज्या मोठा जाला तेव्हांपासून विभक्तपणाचें बोलण्यास प्रारंभ जाला. व्याही यांचे घरीं नाना भोजनास गेले नाहीं.