Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)

१ सौभाग्यवती मनूबाई याचे लग्न जेष्ठ शु।। १५ शके १७४०; कृष्णराव नारायण जोशी सातारकर यांचे पुत्रास दिल्ही. विभक्त जाल्यानंतर वाई मुक्कामीं इंग्रजाचे दंग्यामुळे गेलों तेथे लग्नास चिरंजीव नाना हि आले होते.
१ चिरंजीव नीळकंठराव यांची मुंज चैत्र शु।। १० शके १७४२ समारंभ मोठा जाला.
१ नीळकंठराव यांचे लग्न फाल्गुन शु।। ३ शके १७४३ बाबाजी रास्ते यांची कन्या केली; नाव सौवती पार्वतीबाई ठेविलें; समारंभ चांगला जाला.

१ गोविंदराव तात्या याणीं लौकिक व महत्कृत्यें केलीं-
         १ हरी काशी भोपळे यास केवड्याचे विहिरीकडील जागा घर बांधावयास दिल्ही इमारतसुद्धां २ सोपे व खुली जागा
         १ गणेश जनार्दन यास श्रीरामेश्वर देवाचे उत्तरेकडील जागा इमारतसुद्धां
         १ श्रीरामेश्वर देवालयांतील धर्मशाळा पहिली होती तिचे लगत खण नवे बांधून पूर्ती केली.
         १ मौजे जुवाठी हा गांव इनाम तेथें पूर्वीपासून वतनदार खोत नव्हता. मध्ये बाबाजी प्रभू देसाई खोती मौजेमा।रची वतनी माझी
            म्हणोन वाद सांगत होता तेव्हां चिरंजीव नारो शिवराम याणीं वादास प्रारंभ करविला. नंतर ते मृत्यु पावले त्या दिवसापासून
           पुढें वादास प्रारंभ करून पंचाईतीस रा। बाळाजी नीलकंठ दाते यास नेमून देऊन सरसुभापंचाईतमतें वतनदार खोत देसाई नव्हे
           खोती सरकारची ठरोन सारांष होऊन निवाडपत्र करून घेतलें नंतर बेवारशी खोती सरकारची जाली सबब सरकारांत नजर देऊन
           खोती इनाम आपले न(।)वें करून घेतली व इनामपत्रें खोतीची सरकारचीं करून घेतलीं शके १७++.
        १ बळवंत नारायण पोंक्षे यास घर बांधावयास बक्षीस दिल्हे रु।। ५००० पांच हजार
        १ श्रीमाहायात्रेस श्रीमंत बाजीरावसाहेब यांचा निरोप घेऊन पौष वा। १० शके १७३४ चे सालीं नारायणराव मिरजकर यांचे यात्रेचे संगाबरोबर निघोन सहकुटुंब
          व मातोश्री माकूबाई यांस बरोबर घेऊन चालते जालों मागें चिरंजीव कुसाबाईचे लग्न व्हावयाचें सबब घरीं चिरंजीव नाना यांसी ठेऊन गेलों मागें चिरंजीव
          नाना मंडळीसुद्धां घरीं राहिले आम्हीं नागपूरचे वाटेनें झाडीकडून यात्रेबरोबर जातानां नागपूरचे पुढें मुक्काम बोरीबोहें येथून पोटदुखीस प्रारंभ जाला मिति
          चैत्र शु।। १ शके १७३५ वे दुखणीं हि बहुत जाहालीं. तिरस्थळीं यात्रा केली व श्रीमंत अमृतरावसाहेब यांचा लोभ पूर्वी बहुत संपादन केला होता त्यामुळें त्याणीं
          बहुमान देऊन खर्चास हि थोडें बहुत दिल्हें तिरस्थळीं यात्रा करून देशीं यात्रेबरोबर निघोन नागपुरापर्यंत आलों नागपुरीं येऊन श्रीमंत सेनासाहेबसुभा रघुजी भोसले
          यांणीं गोविंद शिवराम तात्या यांचा घरोबा जाणून बहुमान जातां व येतांना देऊन व खर्चास हि थोडेबहुत दिल्हें नंतर तेथून निघोन पंढरपूरचे मुक्कामीं आलों
          तेथें श्रीमंत बाजीरावसाहेब यांची भेट घेऊन पुढें पुण्यास घरीं येऊन पोहचलों मिति आषाढ वा। १३ शके १७३६. तीर्थरूप मातोश्रीचे वचनाप्रमाणे ईश्वरें
          सिद्धीस नेलें.