Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)

१ श्रीमंत दादासाहेब व नारायणरावसाहेब यांचें वांकडें पडून गर्दीत नारायणरावसाहेब मारले गेले. नंतर दादासाहेब याणीं शिवरामभाऊ यांस खासगीची वस्त्रें दिल्हीं.

१ श्रीमंत दादासाहेब हैदरचे स्वारीस गेले; मागें मातोश्री गंगाबाईसाहेब गरोदर होती त्यांस पुरंधरी कारभारी नाना फडनीस व सखारामपंत बापू यांणी नेऊन ठेविली नऊ मास जाल्यानंतर सवाईमाधवरावसाहेब यांचा जन्म जाला मिति आ वैशाख शु।। ७ शके १६९६ नंतर पुढें कांहीं दिवशीं नीलकंठराव यांस तैनात नाना फडणीस व सखारामपंत बापू याणीं करून देवऊन सरंजाम दिल्हा व अंबारीचा हत्तीसुद्धां दिल्हा.

१ पागा व बाग आहे तेथें नवें घर बांधून शिवरामभाऊ यांसीं गोडीगुलाबीनें विचारून घरी येऊन राहिले सौ। पार्वतीबाई लहान सबब मातोश्री राधाबाईकाकू ही नागपुरीं माहेरी होती त्यांस पूर्वी आणून आपले जवळ ठेविली

१ नीलकंठराव यांस पुत्र व कन्याः-
         १ गोविंदराव तात्या यांचा जन्म : इंग्रजाचे पळणीस पांडवपाडीस गेले तेथे शके १७०२ माघ वा। १४
         १ सौ। आनूबाईचा जन्म शके १७ ++
         १ सौ बहिणाबाईचा जन्म शके १७ ++
         १ सौ ताईंचा जन्म शके १७ ++
         १ हरीपंतनानाचा जन्म शके १७१२ श्रावण शुद्ध ७
       ----
        ५

१ हरी शिवराम यांचा उत्तरविधी पाटठाणी भीमातीरीं करविला.
नंतर मातोश्री काकूबाई यांस माहायात्रा करविली शके १७०८
१ गोविंदराव तात्या
     १ मुंज्य शके १७०८
    १ लग्न वाईंत रामचंद्रराव रास्ते यांची कन्या केली शके १७१२ फाल्गुनमास शुद्ध १०; समारंभ मोठा जाला.
   ---
   २

१ सौ। आनूबाईचें लग्न शके १७१०
गोविंद भटजी निदसुरे यांचे पुत्रास दिल्ही समारंभ मोठा जाला.

१ नीलकंठराव यांणी महत् कृत्यें केलीं
         १ श्रीरामेश्वरदेवापुढील सभामंडप व भोंवतालचा फरस व विहिरीची कड व दरवाजा
         १ मौजे पाटेणाण ता। सांडस येथें श्रीनागेश्वरदेव आहे त्याचें देऊळ बांधिलें.
         १ नांदते वाड्याचा पुढील चौक दिवाणखानासुद्धां नवा बांधिला शके
         १ नांदते वाड्या लगत दुकानें निमे बांधिली. [१७११.
         १ शके १ चे सालीं नारो बापूजी पोंक्षे यास घर बांधावयास जागा रामेश्वरचे दक्षिणेकडील दिल्ही.
         १ किरकोळ लहानमोठीं कामें
         १ ब्राम्हणास घर बांधून दिल्हें.
      -----
        ७