Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)

१ श्रीमंत बाजीरावसाहेब याचें व इंग्रज बहादूर यांचें वाकडे पडलें याचें कारण गंगाधरशास्त्री पटवर्धन गायकवाड यांजकडून वकिलीचीं बोलणीं बोलावयास इंग्रज बाहदर यांचे बाहदारीनें आले होते तेव्हां स्वारी क्षेत्र पंढरपूर येथें सरकारची गेली त्याबरोबर शास्त्री हि गेले ते तेथें प्रदक्षणेचे वाटेवर मारले गेले आषाढमास शके १७++.

त्याचा आरोप त्रिंबकजी डेंगळे याजकडे आला सबब डेंगळे यांस इंग्रज बहादुर यांचे हवालीं करून दिल्हा. पुढें त्रिंबकजी इंग्रजांचे कैदेतून पळोन गेला नंतर श्रीमंताची स्वारी फुलंगाव व आपटी जातानां रथांतून पडून हात दुखवला नंतर स्वारी पुण्यास आली मिति फालगुन शु।। १ शके १७३८. नंतर वैशाख वा। ८ गुरुवारीं शके १७३९ चे सालीं इंग्रजबहादुर याकडील अल्पेष्टीण साहेब याणीं शहराभोवती गिर्द बसऊन श्रीमंतास तंबी पोहचवून सरकारातून सदाशिव माणकेश्वर याचे विद्यमानें पहिले करारा प्रो किले तीन दरम्यान घेतले. नंतर अषाढ शु।। २ इंदुवारीं सरकारातून इंग्रजास मुलूख व किल्ले व ठाणीं व नर्मदाउत्तरतीर दरोबस्त सनदा मोर दीक्षित याचे विद्यमानें देऊन पहिले किल्ले व दरम्यान तीन दिल्हे होते ते माघारे घेऊन संदा दिल्ह्या. नंतर श्रीमंताची स्वारी पंढरपूरचे यात्रेस गेली आषाढमासीं तेथून परभारे माहुलीचे मुक्कामीं येऊन तेथें मलकण साहेब यांची भेट जोहाली. तेव्हांपासून फौज नवी ठेवावयास प्रारंभ करून फौजेचा जमाव करून भाद्रपद वा। १ स्वारी पुण्यास आली. नंतर आम्ही श्रीमंताचा निरोप घेऊन रेवणसिद्ध देवास गेलों मिति अश्वीन शु।। १५. नंतर मागें अकस्मात् अश्वीन वा। ११ बुधवारीं गारपीर बेटाची जागा खालीं करून देण्याबा। लढा पडला सबब बापू गोखले यांचे विचारें श्रीमंतांची स्वारी पर्वतीस जाऊन सर्व सरदार यांस निरोप देऊन इंग्रजाचे तोंडावर रवाना केलें; लढाई मोठी जाहाली मोर दीक्षित वगैरे मंडळी सरकारकामास आली बेट व गारपीरची छावणी जाळली इंग्रजाचा तसनस फार जाला हें वर्तमान आम्हीं मिरजेचे मुक्कामीं ऐकिलें त्यावरून तेथून निघोन पुण्यास यावयास हिर्वे मुक्कामीं आलों तेथें ऐकिलें कीं कार्तिक शु।।। ८ शके १७३९ चे सालीं सरकारची व इंग्रजाची लढाई मातबर तिसरे प्रहरापासून सूर्योदयपर्यंत होत होती तेव्हां श्रीमंत दोन प्रहर रात्रीस निघोनि गेले. मागें अल्पिष्टीन साहेब यांणीं पुण्यांत इंग्रजी झेंडे लाऊन अमल शहरांत बसविल सर्व रयतेस दिलदिलासा देऊन राज्य करूं लागले. हे वर्तमान पुण्यास माणसें पाठऊन आणविलें आणि आम्हीं मुलेंमाणसें भोरास पाठऊन दिली होतीं तेथें जाऊन सर्वांस भेटून पुढें मुलेंमाणसेंसुद्धां वांई मुक्कामास गेलों. श्रीमंत मजलदरमजल गेले मागें इंग्रजाची फौज लागली होती. स्वारीबरोबर हरीपंत नाना याणीं मेहनत फार केली व आम्ही हि श्रीमंतास भेटण्याकरितां वांई मुक्कामीहून गेलो. वाटेनें गांठ पडली पांच चार दिवस स्वारींत होतो. नंतर वाटेनें निभावणी न होय सबब माघारे चिरंजीव नानासुद्धा आलों, नंतर वांई मुक्कामीं अल्पेष्टीण साहेब यांची स्वारी आली तेव्हां भोर जाली. नंतर कांहीं दिवशीं पुण्यास घरीं आलों मिति आषाढ वा। १० शके १७४०. त्याजवर कांहीं दिवशीं अल्पिष्टीन साहेब याजकडे चिरंजीव हरीपंतनाना यास पाठविलें बरोबर बळवंतराव पोंक्षे देऊन रवाना केले. नंतर गोपाळराव रामचंद्र पटवर्धन याचे बाहेदारीने साहेबाची भेट घेतली. नंतर गोपाळराव यांचे विद्यमानें सरंजाम सोडून देण्याविशीं बहुत सांगितलें त्यावरून साहेब याणीं कबूल केलें कीं तुमचा बंदोबस्त करून देऊं म्हणोन खातरजमेनें सांगितले. नंतर साहेबानीं नानास बहुमानवस्त्रें व शिरपेच दिल्हा व बळवंतराव पोंक्षे यास बहुमानवस्त्रें दिल्हीं; नंतर पुण्यास निघोन आले. त्याजवर पुणें मक्कामीं साहेबाची भेट घेऊन पूर्वीचे संकेता प्रा। काम व्हावें तें जालें नाहीं. बडेसाहेब यांची स्वारी निघोन ममईस गेली नंतर मागें चापलीन साहेब याणीं उभयतास पेनशीन हजार हजार रु।। सालदरसाल द्यावे या प्रमाणें चकत्या करून दिल्या.