Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
१ हरी शिवराम भाऊसाहेब यांबरोबर पाणिपतास गेले होते तेथें लढाईत राहिले ठिकाण लागलें नाहीं शके १६८२ त्यास स्त्रिया दोन
१ लक्ष्मीबाई
१ राधाबाई
---
२
१ पांडुरंग शिवराम परशरामभाऊ पटवर्धन यांजकडे होते व पंढरपूरचें सवस्थान व मौजे कयवल्ली येथील वहिवाट करीत होते पुढें दुखणें होऊन काल जाला
अशाढ व।। ४ शके १७२० त्यांस पुत्र व कन्या
१ रघुनाथराव
१ शिवरामपंत आप्पा
१ कन्या सौ। विठाबाई अंध
----
३
१ आनंदराव जिवाजी जिवाजीपंत अण्णाचा काळ जाल्यानंतर खासगीचा कारभार शिवरामभाऊ लाहान सबब करीत होते पुढें श्रीमंत थोरले रावसाहेब यांची कृपा बहुत संपादन केली पुढें शिवरामभाऊ यांस खासगीचीं वस्त्रें दादासाहेब याणीं दिल्हीं पुढें उपजीविकेस किल्ला सिहीगड व सरंजाम दिल्हा नंतर पुढें बाजीरावसाहेब यांच अमलांत काल जाला शके त्यास पुत्र केशवराव
१ गोविंद शिवराम तात्या याणीं आपले स्वपराक्रमानें श्रीमंत नानासाहेब यांची कृपा चांगली संपादून कारकुनीचा पेशा एकीकडे ठेऊन मुछ्दगिरीचें काम करून कारभार करूं लागले पुढें नानासाहेब यांचा काल जाल्यावर माधवरावसाहेब यांची हि कृपा चांगली संपादून अंबारीचा हत्ती नानासाहेब यांचे वेळेस व स्वाराचे सरंजामास गाव मौजे हिपरगी दिल्हा जातीस तैनात करून देत होते परंतु घेतली नाहीं श्रीमंत दादासाहेब व रावसाहेब यांचे मध्यस्ती नेहमी बोलण्यांत होते व वकिलाती होत्या इंग्रज व होळकर व भोसले व नबावाकडील रुकनतदौला यांजकडील ऐसे वकिलातीची कामें होतीं मुंबईस कामाकरीतां एक दोन वेळा गेले होते. श्रीमंतांबरोबर स्वा-या बहुत केल्या स्वराज्यांत व परराज्यांत सर्वांवर कृतोपकार बहुत केले घरगुती कृत्यें