Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
१ नारो बापूजी पोंक्षे यास काळपुळी होऊन देवआज्ञा जाली मित्ती कार्तिक वा। १३ शके १७१३; पुढें त्यांचे चिरंजीव बळवंतराव नारायण कारभार करीत होते.
१ नीलकंठराव यांस क्षयाची भावना होऊन दोन वर्षे दुखणें जाहालें सबब समाचारास नाना फडणीस व हरीपंत फडके आले तेव्हां सांगितलें कीं श्रीमंतास विनंति करून दाहा बिघे जमीन इनाम ब्राम्हणास द्यावयाकरितां देवावी त्यावरून त्याणीं श्रीमंतांस विनंति करून दाहा बिघे जमीन बाम्हणीस देवविली त्याचें इनामपत्र आपले नावें करून घेऊन ब्राम्हणास दिल्ही. नंतर कार्तीक शु।। १३ शके १७१४ देवाज्ञा जाली. सौ। पार्वतीबाई याणीं सहगमन करते वेळेस सांगितलें जे आमचें गयावर्ज्यन तीन वर्षांत करावें व चिरंजीव नाना लाहान आहे त्यास अंतर देऊ नये. सर्व मुलें मातोश्री काकूबाई याचे स्वाधीन करून सहगमन केले.
१ नीलकंठराव याचा काल जाल्यानंतर गोविंदराव तात्या यांस नाना फडनीस याणीं श्रीमंत सवाईमाधवराव यांस विनंति करून बहुमान वस्त्रें चार सनगें व कंठी मोत्याची दिल्ही व सरंजाम पूर्ववत् प्रमाणें करार करून देऊन तैनातजाबता करून दिल्हा व निसबतीस अंबारीचा हत्ती दिल्हा शके १७१४. कारभारी बळवंतराव नारायण पोंक्षे.
१ चिरंजीव सौ बहिणाबाई यांचे लग्न शके १७++. विश्वनाथ जोशी सातारकर यांचे पुत्रास दिल्ही.
१ स्वारी खर्डे श्रीमंताबरोबर शके १७१६ मोगल मोडून श्रीमंतास यश मोठें आलें व मौ।मुलुख कारभारी व छत्तीस लक्षाची जाहागीर घेऊन आले.
१ चिरंजीव सौ। ताईचें लग्न शके १७++. भास्कर हरी पटवर्धन याचे नातवास दिल्ही.
१ श्रीमंत सवाईमाधवरावसाहेब यांची कृपा बहुत संपादन केली नंतर श्रीमंत दिवाणखान्यातून पडून देवाज्ञा जाली मित्ती आश्विन शुद्ध १५ शके १७१७.
१ श्रीमंत बाजीरावसाहेब व अमृतराव व चिमाजीआप्पा यांस पुण्यास नानाफडणीस वगैरे कारभारी याणीं आणिलें नंतर राज्याची वस्त्रें देवऊन राज्य करूं लागले शके १७१८ माघ वा। ३.
१ हरीपंत नाना यांची मुंज शके १७१++.
१ गोविंदराव तात्या याचें दुसरें लग्न सौ। गोपिकाबाई यास क्षयाची भावना जाली सबब केलें शके १७१+. ज्येष्ठमास बापू वाडके(दे?)कर यांची कन्या केली नांव सौ रमाबाई ठेविलें.
१ सौ गोपिकाबाई गोंविंदराव तात्याची प्रथमस्त्री यांस क्षयाची भावना होऊन वाईंत कृष्णातीरीं देवआज्ञा झाली मिति माघ वा। १२ शके १७++.
१ हरीपंत नाना याचें लग्न शके १७++ गणपतराव मेहेंदळे यांची कन्या केली नाव सौ लक्ष्मीबाई ठेविले.
१ नाना फडणीस यांस शिद्यानीं कैद केलें सबब नानाकडील आरब वाड्यांत शिरले त्याणीं खराबी फार केली शके १७++. वाडयांत आरब शिरले ते न निघे सबब शिंद्यानीं वाडयास तौफा लाविल्या.
१ श्रीमंत बाजीरावसाहेब राज्यावर आल्यापासून खराबी बहुत जाली
१ सरंजामपट्या वगैरे ऐवज बहुत घेतला
१ नानाफडनीस यांचा काल जाल्यानंतर निमे सरंजाम नेमणुक व गांव जप्त केले
१ अंबारीचा हत्ती निसबतीस होता तो हि घेतला.
----
३