Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
१ पुण्यांत जागा नवी संपादन करून बाग व पाया दुकानें बांधलीं
१ श्रीरामेश्वरदेवाचे देवालय नवें बांधिलें
१ कोकणांत मौजे जुवाठी हा गांव इनाम करून घेऊन सनदेंत पांच नावें करून घेतली
१ कसबें पैठण व पंथेवाडी येथील कुणकर्णी खा।।
१ बाळाजीपंत फडके हे कारभार करीत होते त्यांनी व्यवहार कुरून बहुत बुडविलें व लोकाचें देणें हि बहुत केलें खराबी फार जाली फडके वीष खाऊन मृत्यु पावले.
१ पुणें जळालेनंतर पागेंत येऊन राहिले तेथें दिवाणखाना व तांब्याचे पत्र्याचा बंगला बांधिला. रुजू लोखंडी कल्हेदार पत्र्याचा बंगला
१ बाळाजीपंत फडके यांची तोहमत मोठी पडली त्याबदल शिवरामपंत आप्पा व जिवाजीपंत आण्णा यांणी सांगितले जे तुमचे व्यवहार मोठे व तोहमती हि मोठ्या त्यास तुमची जमा व तुमचें देणें तुम्हीं संभाळावे. त्या दिवसापासून विभक्त.
१ गोविंद शिवराम तात्या यास पुत्र व कन्या
१ नीलकंठराव याचा जन्म शके १६८० फालगून
१ सौ कुसाबाई वडील रघुनाथराव गद्रे यास दिल्ही
----
२
१ नीलकंठराव याची मुंज
१ नीलकंठराव याचें लग्न शके कृष्णाजी बहिरव थत्ते यांची कन्या केली. नांव पार्वतीबाई ठेविलें.
१ मोठीं मोठीं कृत्यें लिहिलीं शिवाय किरकोळ बहुत कृत्यें आहेत.
१ गोविंद शिवराम तात्या दादासाहेब यांजकडे जाण्याबद्दल प्रस्थानानें बागेंत राहिले तेथें काळपुळी जाली सबब माघारे घरीं येऊन रुप्याची तुला केली नंतर काल जाला; मिति चैत्र वा। १२ शके १६९४ चे सालीं सौवती गोपिकाबाई याणीं सहगमन केलें. श्रीमंत थोरले रावसाहेब बहुत कष्टी जाहाले. ते वेळेपासून पुढें कारभारी नारो बापूजी पोंक्षे होते.
१ गोविंद शिवराम तात्यांचा काल जाल्यावर श्रीमंत कैलासवासी माधवरावसाहेब याणीं नीलकंठराव यांस वस्त्रें व चौकडा बहुमान दिल्हा; त्यांजकडील वकिलीची कामें पूर्ववतप्रमाणें कायम ठेविलीं. नीलकंठराव लहान सबब नारोपंत पोंक्षे बोलणीं बोलत होते.
१ नीलकंठराव लाहान सबब नारोपंत पोंक्षे कारभार करीत होते. नंतर थोरले रावसाहेब यांस दुखणें लागून थेउरास काल जाला मातोश्री रमाबाईसाहेब याणीं सहगमन केलें नंतर श्रीमंत नारायणरावसाहेब यांचे कारकिर्दीत घरचिंतना. अनंतराव जिवाजी व पांडुरंग शिवराम यांसीं कलह लागला. हिंदुस्थानचे घाड्यावरून नारोपंत यावर गर्दी केली तेव्हां नीळकंठराव यांस उरांत तरवारीचा गाभ्या लागला नंतर ते वेळेस पोंक्षे यास मातोश्री गोदूबाई यांणीं विचारलें कीं शिवरामभाऊची वाट काय त्यावरून रायास व भाऊ ऐसे उभयतांस रात्रीं घेऊन परशरामभाऊ पटवर्धन यांचे घरीं येऊन राहिले. नंतर पहिला वाडा सरकारवाड्यासन्निध आहे पुणें जळालें तेव्हां जळाला होता तो नवा बांधिला होता तेथें उभयता येऊन राहिले.