Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)
जिवाजीपंतअण्णा आप्पा काशीस गेल्यानंतर खासगीचें काम करीत होते लौकिक मोठा संपादून पुढें मृत्यु पावले फालगुन ११ शके
शिवरामपंत आप्पा व जिवाजीपंत अण्णा पूर्वी नारायणराव घोरपडे इचलकरंजीकर यांचे पदरीं होते बाजीराव बल्लाळ पेशवे यांची बहीण आनूबाई नारायणराव घोरपडे जोशी यांचे पुत्रास दिली ते समई घोरपडे याणीं शिवरामपंत आप्पा यांस बाजीराव यांचे हातीं दिलें रोजगार चांगला सांगावा म्हणून सांगितलें यावरून बाजीराव साहेब याणीं शिवरामपंतआप्पा यांस प्रथम मौजे पाडळी प्रा। वाई संमंत कोरेगांव येथील कमावीस सांगितली नंतर सातारियांतील वाड्याचें काम सांगितलें कुटुंब कापशीस होतें तें पाडळीस आणिले पाडळींत घर नवें बांधिलें सातारियांतील वाड्याचें काम चांगले मर्जीजोगें केलें सा। पुणियांतील वाड्याचें काम सांगून खासगीचें काम सांगितलें शके १६५४ परिधावीनाम सनसलास सलासीन मया व अलफ श्रावण वा। ५ स वाड्यास प्रारंभ केला खासगीचें काम जाल्यापासून नवरात्राचा उछाह करूं लागले
१ रघुनाथ शिवराम यांचा जन्म कापशीस जाला शके
१ गोविंद शिवराम तात्या यांचा जन्म पाडळींत जाला शके
१ हरी शिवराम याचा जन्म
१ काशीबाई यांचा जन्म काशीत जाला शके
१ पांडोबाबाबा यांचा जन्म पंढरपुरीं जाला शके १६
१ खासगीचा कारभार शिवरामपंत आप्पा करीत होते बाजीरावसाहेब यांचा काल जाला नंतर बाळाजीपंत नानासाहेब यांचे हातीं चिरंजीवास व जिवाजी पंत अण्णा यांस देऊन आपण निरोप घेऊन श्रीकाशीस गेले तेथें अग्निहोत्र घेतलें यज्ञ केला सर्वस्व दान केलें नंतर देशीं येऊन पंढरपुरी राहिले तेथें वाडा व संस्थान श्रीपांडुरंगाचें करून राहिले नंतर श्रीमंतानीं गाव संवस्थानचे खर्चीस मौजे कवयली दिल्ही खासगीचे काम जिवाजीपंतआणा करीत होते पुढें शिवरामपंतआप्पा पंढरपुरी मृत्यु पावले शके
१ शिवरामभाऊ यांस खासगीचीं वस्त्रें श्रीमंत दादासाहेब यांणी दिल्हीं शके १६९५ अश्वीन शु।। २ पुढें भाऊनीं श्रीमंत सवाई माधवराव यांचे
अमलांत अंबारी हत्ती व राजश्री किताब मिळविला वाड्याचा चौक पुढील बांधिला पुढें भाऊस दुखणें लागून काल जाला शके
१ शिवरामभाऊ यांस पुत्र नारोपंतआप्पा यांस खासगीची वस्त्रे श्रीमंत सवाई माधवराव याणीं दिल्हीं पुढें श्रीमंत बाजीराव साहेब यांचे
अमलांत दुखणें लागून मृत्यु पावले शके १७ पुढे नकल मित्ती भाद्रपद शु।। १४
----
२