Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौदावा (खाजगीवाले दफ्तर)

१ श्रीरामेश्वरदेवाचे दक्षणेस खुली जागा होती तेथें नवी इमारत लाकडी सभामंडपसुद्धां बांधोन त्या जाग्याचे नांव विष्णुमंदिर ठेऊन तेथे श्रीविष्णूची स्थापना लक्ष्मीसहित केली.
       १ श्रीविष्णूची स्थापना मिति ज्येष्ठ शु।। ७ शके १७४४
       १ श्रीलक्ष्मीची स्थापना मिति माघ शु।। ६ शके १७४९. या जाग्यांत नहराचें पाणी बागेतून नेऊन पाण्याचा हौद देवाचे पिच्छाडीस बांधिला
          व हौदालगत सोपा चार खणाचा बांधिला.

१ जन्माष्टमीचे उत्साहास नवीन प्रारंभ इ।। शके १७२५ पासून केला.
१ माहायात्रेस जाण्याचे पूर्वी उभयता बंधू व हरी काशी भोपळे व गणेश जनार्दन ऐसे बसून बहुत गोडीच्या गोष्टी बोलत होते त्यावर नानाचे बोलणे पडलें जे हीं बोलणीं वरकांतींची आहेत सर्वखदोलतीचा कागद लिहून देणें परम कठीण आहे म्हणोन बोलले त्यावरून ते च बैठकीस सर्वस्वदौलत तुमची म्हणोन कागद लिहून दिल्हा त्या कागदावर साक्षी हरीपंत व गणेश जनार्दन व सदाशिव खंडेराव व गोविंदराव करंदीकर या चौघानीं घातल्या. तो कागद नानानीं पाहून कांहींएक दिवशीं परत दिल्हा तो फाडून टाकिला त्यावरून नाना विभक्त होणार ही खातरजमा वाटत होती.

१ गोविंदराव तात्या व हरीपंत नाना उभयता बंधू एकत्र असतां तात्या माहायात्रेस गेल्यामागें नानाचे मनांत हरएक किंतु येऊन विभक्त व्हावें ऐसे जाहालें त्यावर नानास लोकानीं अनुमोदन बहुत दिल्हें यास कारण आम्हीं काशीहून बळवंत नारायण पोंक्षे यास कागद पाठविला त्यास तो पोंक्षे याणीं नानांस दाखविला तेव्हांपासून विभक्त व्हावें हा हेतू मनांत बहुत होता परंतु त्याजवर चिरंजीव सौ काशीबाईचे लग्नांत उपाध्ये याचे दक्षणेवरून उभयता बंधूंचा कज्या मोठा जाला तेव्हां विभक्त व्हावें असें बोलणें नानाचें पडलें तेव्हा बहुत प्रकारें सांगितलें कीं विभक्त न व्हावें. तीर्थरूप मातोश्री याची आज्ञा जे नाना लहान आहे त्यास अंतर देऊ नये ऐसे सांगोन त्यांणीं सहगमन केलें तें स्मरोन घरगुती मंडळीकडून बहुत प्रकारें सांगोन पाहिले परंतु न आईकेत तेव्हां त्यांणी दोन कलमांचा मुद्दा सांगितला कीं तात्याचे दोन मुलींची लग्ने जालीं व माहायात्रा हि जाली त्यास माझे मुलीचें लग्न करावयाचें आहे व माहायात्रा करावयाची आहे त्याचा ऐवज समाईक पो घ्यावा म्हणोन बोलणें पडलें त्यावरून मातोश्रीचे आज्ञेवरून सदरहू दोन कलमें लिहिलीं आहेत तीं समाईक ऐवज पो करूं म्हणोन सांगितलें तत्राप न ऐकत सबब दोनप्रहर रात्री कागद लिहून दिल्हा कीं तुमचे मुलीचें लग्न व माहायात्रा समाईक ऐवज पो करावा ऐसें लिहून दिल्हें तो दस्ताऐवज हातास येई तोपर्यंत विभक्तपणाची बोलणीं बोलत होते. दस्ताऐवज हातीं आल्यावर चार महिने एकत्र विचारें चालले नंतर पुन्हा विभक्त व्हावें म्हणोन बोलणें पडलें त्यावरून विभक्त न व्हावे सबब रा।। गणपतराव पानसे व गणपतराव बापू मेहेंदळे व बळवंतराव पोंक्षे या त्रिवर्गाकडून बहुत प्रकार सांगविले परंतु त्याचा दुराग्रह विभक्त होण्याविशीं फार कोणाचें हि न ऐकत सबब आषाढ शु।। १ शके १७३७ चे सालापासून विभक्त वाटणी यथाविभागें रा। गणपतराव बापू मेहेंदळे व गणपतराव पानशे व बळवंतराव पोंक्षे या त्रिवर्गाचे विद्यमानें याद ठरोन वाटणी दिल्ही. पहिला कागद लिहून तो माघारे घेऊन दिल्हा सबब मोहगम समाईक पो चिरंजीव यमूबाईचे लग्नाबा। पांच हजार काढून बाकी वाटणी यथाविभागें करून दिल्ही. जराबजरा लोहलोखंडसुद्धां देऊन परस्परें फारखती जाल्या मिति अश्वीन शु।। १ शके १७३७. पूर्वी पंचाइतींत विसाजी गणेश प्रतिपक्षानें बोलत होता सबब त्यास पंचाइतींतून उठऊन दिल्हें त्या दिवसापासून नानाचा कारभार करूं लागले व नांदतावाडापैकी पुढील चौक नवे इमारतीचा व पागा वगैरे जागा व दुकानें निमें नानाकडे व बागे पो निमे पश्चमेकडील पाणी लगत जमीन चांगली त्या जमिनींत कीर्दीची झाडे नारळीचीं आहेत तीं समाईक ठेवावी म्हणोन पंचानी नानांस बहुत प्रकारें सांगितलें परंतु त्यांचे हि नाना न ऐकत सबब झाडेंसुद्धां निमे वाटणी नानास दिल्ही.