Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ४४.
१७०६ मार्गशीर्ष शुद्ध ११.
श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी:-
पो गोविंदराव पुरुषोत्तम कृतानेक सां। नमस्कार विनंति येथील कुशल ता।छ ९ माहे मोहरम जाणोन स्वानंद-लेखनाज्ञा केली पो. विशेष. आपण छ २६ जिलकादचें आज्ञापत्र पाठविलें तें छ ३० जिल्हेजीं पावोन सनाथ जहालों. पत्रीं आज्ञा कीं, पातशहा अग्रियास दाखल जहालेच आहेत, तेथून पुढें गेले किंवा तेथेंच आहेत ते ल्याहावें, व राजश्री महादजी शिंदे यांच्या व पातशहाच्या भेटी कधीं होणार, शिंद्यास येथून वरचेवर लिहीत जात असतात, तुह्मींही होईल ते मजकूर मारनिल्हेस वरचेवर सुचवीत जावें, ह्मणून पत्रीं आज्ञा. त्यास, आज्ञेप्रों विशेष वृत्त आढळल्यास पाबावास लिहितों व श्रुत करीत असतों. इकडील बारीक-मोठें वृत्त छ १९ व छ २१ माहे जिल्हेजीं पै दरपै विनंतिपत्रें पा तीं पावलीं असतील. त्यावरून श्रुत जालेंच असेल. हालीं वर्तमान तर महमद बेग हामदानी यास आणून कैद केलें आहे. त्याचा असबाब तोफा पंचावन्न व हत्ती बारा १२ वगैरे सरंजाम होता त्याप्रों कांहीं राजश्री पाबावानीं आपलें सरकारांत घेतला. कांहीं हिंमतबहादुर याजकडील तोफा महमदबेगानें पेशजीं लुटून नेल्या होत्या त्या त्यास दिधल्या. राहिला सरंजाम अफराशाहाबखान याचा घरचा आहे. त्याजपासून कांहीं पैका घेणें. त्याणीं राजश्री पाबावाशीं करारमदार केला आहे कीं आमची सरदारी आह्माकडे असावी. त्यावरून करारमदार करून त्याचे पुत्रास सरदारी करार केली आहे. त्याचें नांव हुसेनुद्दोला बाहादूर. महमद-हुसेनखान गालबज्यंग ह्मणून किताब देऊन वस्त्रें मातम पुरसीचीं व पैका आणावयास अलिगडास माणसें पा आहेत. व तो मूल तीन वर्षांचा आहे, त्यासही लस्करांत बोलाविलें आहे. व मोगली वगैरे सरदार यास हिंमतबहादर आणि नारायणदास याणीं जाबसाल लाविला आहे कीं, तुह्मी बहुता दिवसांपासून सरंजाम खातां, आतां कांहीं पैक्याची तुह्मीही कुमक करावी, म्हणून महमदबेगसुद्धां जितके सरदार मोगली वगैरे आहेत त्यांस तगादा आहे. त्यांचे लष्करचे असल्यास रा। पाटीलबावांचीं पलटणें व फौजेचा चौका आहे, तेही पासीं आहेत. हिंदुस्थानचे यवनाच्यासिवाय पातशाहात शांत जहाली ! कांहीं त्यांत जीव राहिला नाहीं ! पातशहाची मर्जी सर्व प्रकारें राजश्री पाटीलबावाकडे मुतवजे आहे. छ ४ तारखेस पातशहासी व राजश्री पाटीलबावासी खलबत जालें. पातशहानीं आज्ञा केली कीं, तुह्मी आमचे घरची मुख्त्यारी कबूल करा. याणीं उत्तर दिल्हे कीं, ताजियाचे दिवस आहेत, गेलियावर विनंति करीन. म्हणून बोलून आपले डेरियास आले. पुढें अंमलांत येईल ते विनंति लिहूं. बहुत काय लिहिणें? कृपा केली पाहिजे. हे विनंति.