Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ४८.

१७०६ मार्गशीर्ष शुद्ध ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे : इष्टिन साहेब इंग्रेज पातशाहाजाद्यास घेऊन श्रीकाशीस गेले, हे वर्तमान विलायतेत कंपनीने ऐकून इष्टिनास पत्र लिहिलें कीं, तुह्मी हिंदुस्थानचे पातशाहाजादा समागमें घेऊन येतां, त्यास तुमचा काय इरादा आहे ते लिहून पाठविणें, एकतर दक्षणी सरदारांचा आमचा सलूक जाला आहे आणि त्यांचे मर्जीशिवाय त्यांसी बसदलूकी करून पातशहाजाद्यास विना त्यांची मर्जी घेऊन आला हें ठीक नाहीं, तर देखतपत्र पातशहाजाद्यास माघारा रा। पाटीलबावापासीं बिदा करणें, ते पातशहास विनंति करून पातशाहाजाद्याची तकसीर माफ करून त्याचे स्वाधीन करितील, तुह्मी या बखेड्यांत न पडणें. म्हणून लिहिलें होतें. त्याजवरून इष्टिन इंग्रेज याने पातशाहाजाद्यास समागमें दोन पलटणें देऊन, रा। सदासिवपंत बक्षी रा। पाटीलबावाकडील याजसमागमें बिदा केलें. ते लखनऊस आले आहेत. पुढे लस्करांत जालियावर विनंति लिहूं. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.