Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ४०.

१७०६ आषाढ वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे :- राजश्री कृष्णराव गोविंद याचे पुत्राकडे उदेपूरचा कारभार होता. तो त्याजकडून काढून राजश्री बाळाजी बल्लाळ काटेकर याजपासून पाऊण लक्ष रुपये घेऊन त्याजकडे उदेपूरचा कारभार सांगितला. त्यास हत्ती, घोडा, शिरपेंच, गांव, वस्त्रें, येणेंप्रों देऊन सन्मान करून, बिदा केलें आहे. परंतु कागदपत्राचा बंदोबस्त होणें ह्मणून राहिलें आहेत. आठा पंधरा रोजांनीं जाणार. बुंदी, कोटे, उदेपूर, ऐशा तीही संस्थानच्या मामलती व चवथाईचे अमलाचा मामला मारनिलेकडेस करार जाली. मागील हिशेबाचे कांहीं फडशे जाले. कांहीं शेष बाकी फडशा होणें आहे तो करून जाणार. व रामगडाकडे रायाजी पा। फौजसुद्धा गेले आहेत, त्यांनीं कोळेचे शहरांत ठाणें बसविलें. तेथें दोन पलटणें, चाळीस तोफा होत्या त्यापों एक पलटणवाला फुटून याजकडे जाबसाल लाविला. त्याची खातरजमा रायाजी पा। याणीं केली. त्यानें कोळेचे दोन दरवाजे उघडून दिल्हे. त्या मार्गें याजकडील फौज व पलटणें आंत शिरून, एका पलटणासी लढाई होवून, याजकडील जखमी व जाया च्यारसें माणूस जालें. पलटण पळून गेलें. चाळीस तोफा वगैरे सरंजाम सरकारांत आला. मौजे कोळे येथील ठाण्याचा बंदोबस्त करून, रामगडास घेरा घालून, रायाजी पा। आहेत. कांहीं कांहीं दिवसा रामगडही खाली होईल. आंत जमादार व पलटणवाले आहेत, त्यांत फूट आहे. त्याजकडीलही बोलणीं लागलीं आहेत. प्रत्ययास येऊन गड खाली जालियावर विनंति लिहूं. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.