Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ३९.

१७०६ आषाढ वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे:- येथील प्रकार तरी : हिंदुस्थान नि:क्षत्री जालें. शीख आहेत त्यांत फूट आहे. कोणी कोणाचे स्वाधीन नाहीं. दबाब पडल्यास जमीदारी करावयासही लागतील. जेर-जबरदस्तीनें पे॥ तरी लुटीत फिरत आहेत. हें शिखाचें वर्तमान आहे. वजिराचा प्रकार म्हणावा तर इंग्रजांवर त्याची दौलत आहे. त्यास सापत्य इंग्रजांचा प्रकार हलका दिसतो. विष्टिन विलाइतीस गेला. त्याचे बदली बडे साहेब ह्मणोन आले आहेत. याचा बंदोबस्त विष्टिनाप्रोंनाहीं. वख्त नेकही पूर्ववत्प्रो॥ नाहीं. परंतु पहिली फरपट चालत आली आहे त्याजप्रों कारभार चालतो व पातशहाचा प्रकार ह्मणावा तरी, येक लाख तीस हजार रु।। दरमहाचा चाकर आहे. तितका पैका अक्षत मरीट मिळाला ह्मणजे त्यास एका गांवासीं व बिघाभर जमिनीसीं गरज नाहीं. याप्रों हिंदुस्थानची अवस्था आहे. त्यास, अवघे हिंदुस्थानचे बंदोबस्ताचा वोझ येकल्या राजश्री पाटीलबावावर आहे. जितका बंदोबस्त यांचे जिवेंकरून नीतीनें कर्णें तो केला आहे व करावयाचा तो करितात. परंतु यांचे पदरीं कोणी मनुष्य नाहीं कीं, यांचे सरदारीचा सरदारांतून मुलकी बंदोबस्त करून, पैका उत्पन्न करून, दौलत सांभाळी ऐसा मनुष्य नाहीं. याजकरितां स्वामीस सूचनार्थ विनंति लि॥ आहे. जो प्रकार दृष्टीनें पाहिला आणि प्रतियास आला, तो जाणोन विनंति लिहिली आहे. पुढें उत्तम जाणतील ते करणार स्वामी समर्थ आहेत. बहुत काय लि।। ? कृपा केली पो. हे विनंति.