Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ४७.

१७०६ मार्गशीर्ष शुद्ध ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे : छ ३ मिनहूस पातशहा, अफराशाबखान याचे लस्करांतून कूच करून अंबाजी इंगळे याचे व पाटीलबावांचे लस्कराचेमधें जाऊन मुकाम केला. डेरियास दाखल जाले त्यासमयीं राजश्री पाटीलबावांनी एकवीस मोहरा नजर केल्या. पाटीलबावांचे लस्करांत पातशहा दाखल जाले. हिंदुस्थानी लस्कर दरोबस्त एकीकडे आहे. पाटीलबावा, पातशहा, अंबाजी इंगळे ऐसे एकीकडे आहेत. या नक्षानें मुकाम करून आहेत. च्यारशे तोफा व दहा हजार स्वार व तीस पलटणें एकूण चाळीस हजार स्वार प्यादा, विना तलवार पादाक्रांत होऊन जैसी पाण्यांत माती पडून विरून जाती त्याप्रों यवनाचे फौजेची अवस्था जाली आहे. कोणी कोणांत मिळत नाहींत, याप्रमाणें जालें. पुढें अमलांत येईल ते विनंति लिहूं. बहुत काय लिहिणे ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.