Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ४५.
१७०६ मार्गशीर्ष शुद्ध ११.
पु.॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे :- नबाब अफराशाहाबखान मारला गेला त्याचा आरोप जैनूज अहदीखान याजकडे आला. त्यावरून त्यास कैद करून, गाढवावर बसवून, तोंड काळें करून, लस्कराचे आसपास फिरवून, भीक मागवून, कैद करून, ग्वालेरीस पाठवितील. दुसरें खुशालराम वकील राजे जैनगरकर याचा लष्करांत होता तो पेशजी रावराजा प्रतापसिंग याचे दुंबाल्याची दिवाणगिरी मुखत्यारी करून होता. अलीकडे नजबखानासी मिळून मागें रावराज्यास लुटविलें होतें म्हणून त्याची व याची आकस होती. त्यास एका xx यानें मारून टाकिलें तो xxxx व राजा प्रतापसिंग याचे टुमेवर आला त्याजवरून त्याचे लस्करावर दोन हजार फौजेची चौकी राजश्री पाटीलबावांनीं पाठविली आहे. पुढें जें ठरेल तें विनंति लिहूं. तात्पर्य, पैका मेळावयाचे दिवस आहेत. श्रीमंत राजश्री पंत-प्रधान-साहेब दैववान आहेत कीं, त्यांचे प्रतापें यश सेवक लोकांस यत्न न करतां येतें. ईश्वर त्यांस सलामत बेसलामत राखो आणि दिवसेंदिवस अधिक प्रताप होवोत. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.