Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ४१.
१७०६ आषाढ वद्य ११.
पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे : मोहरसिंग शीख यांस रावराजा प्रतापसिंग याजवर तनखा करून पत्रें दिधलीं आहेत कीं, पावणे तीन लक्ष रुपयांचे प्रगणे जैपूरपैकीं लावून देणें. म्हणून पत्रें लिहून देऊन करारमदार जाला कीं, पातशाही खालशाचा मुलूक आहे त्यांत धामधूम करूं नये. व राखी घेऊन ठेवले प्रो वर्तणूक करून जैपूरचे महालीं रावराजाकडील देइल तो ऐवज घेऊन स्वस्थ असावें. सरकारचा अंमल सरहिंदेकडे जाईल त्या समईं पांचा हजारा स्वारांनसीं समागमें असावें. तिकडील मुलूक सुटेल त्याप्रों दहा लक्षांची जागा आणिक लावून देऊं. म्हणून करारमदार होवून, त्यास वस्त्रें देऊन, बिदा केले. त्यास मोहोरसिंग व कुज्यासिंग हे दोघेजण लष्करास असतां, याप्रो बोलणें बोलत असतां व सरंजाम लावूं देणें व दिल्हा ऐसें असोन, यांचें निसबतीचे शीख अंतर्वेदीत मेरटेकडे जाऊन दर रुपयास दोन आणे येणेंप्रों तमाम अंतर्वेदीत तहशील केली व करितात. याप्रों वर्तमान आहे. मुलूक मोठा. कारभार मोठा. परंतु अद्यापि खातरखा बंदोबस्त नाहीं. प्रत्ययास आलियावर विनंति लिहूं. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंती.