Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ४६.
१७०६ मार्गशीर्ष शुद्ध ११.
पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे :- छ २६ माहे जिल्हेजीं पातशाहा आग्रियाहून कुच करून शिल्लक किस्ती दर-गावास भरती करून, मौजे फत्तेपूरसमीप लस्कर अफराशाहाबखान यांचे होतें तेथें दाखल जाले. राजश्री पाटीलबावा भरतपुराचेनजीक होते, तेथून कुच करून पातशहाचे लस्करासमीप आठ कोसांवर येऊन मुक्काम केला. छ २९ रोजीं मिरजा अकबरशाहा यास पातशहानीं नबाब बहीरमखानास समागमें देऊन सामोरा पा। राजश्री पाटीलबावांनीं आपले लस्कराबाहेर डेरा उभा केला होता तेथें अकबरशहास बसविलें. एक हत्ती, एक घोडा, सात किरमिजी पोशाक वस्त्रें, व एक खिरमी जवाहीर व एकशें एक मोहोरा नजर व हामराही सरदार राजश्री कृष्णाजी पवार वगैरे याणीं माफक मरातब नजरा देऊन, त्याजसमागमें पातशहापाशीं येऊन, पातशहाची मुलाजमत जहाली. पायावर डोई ठेवून एकशें एक मोहोर नजर केल्या. याजसमागमील सरदार कृष्णाजी पवार आदिकरून किरकोळी होते, त्याणीं माफक मरातब अवघ्यांनीं नजरा केल्या. राजश्री पाटीलबावा यांचे पाठीवर पातशहानीं बहुत ममता-पुरस्कार हात ठेवून आज्ञा केली कीं, तुह्मी उरुबरा बसा. त्याजवर राजश्री पाटीलबावा बसले. पातशहानीं पारच्या खिलत, जगा बमय, परगीरी व शिरपेंच व मोत्यांची कंठी व हत्ती, घोडा, तरवार, ढाल, येणेंप्रों सन्मान केला. हामराही कृष्णाजी पवार वगैरे सरदार होते त्यांस खिलत पांच पांच पारच्याचे, बमय, शिरपेंच व जगे सुध्धां सुमार खिलत ५० पन्नास व दुशाले सुमारें दीडशें व गोशवार दीडशें व येणेप्रों तरवारीचे कबजे च्यार व वस्त्रें देऊन, सन्मान करून, दोन घटका पातशहासी खलबत करून, रुकसत होवून, आपले डेरियास जाऊन, पातशाचे लष्करचा व अफराशहाबखानाचे लष्करचा बंदोबस्त आपलीं पलटणें बसवून केला. शिवाय पाटीलबावाचे परवानगीशिवाय हकडून तिकडे जाऊं पावत नाहीं. पातशहाचे लष्करचे लोक अफराशहाबखानाचे लस्करांत कोणी जाऊं पावत नाहीं. याप्रों बंदोबस्त करून पैका कराराप्रों आणवण्याचा तगादा आहे. पुढें पातशहाचे विच्यारें राजश्री पाटीलबावा मसलत ठरवितील ते विनंति लिहूं. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पों हे विनंति.