Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३७.
१७०६ आषाढ वद्य ११.
पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे:- राजश्री पाटीलबावानीं आपलेकडून खिलत वस्त्रें रवाना केली बितपशील:-
१ मंजूर- अल्लीखान नाजर यासी दिल्लीस पाठविली. साता पारच्यांची खिलत, वस्त्रें, मोत्याची कंठी व जगा शिरपेंच व हत्ती, व घोडा व तरवार येणेंप्रमाणें.
१ सीतलदास मारनिलेचा पेषकार. त्यासी पाचा पारच्यांची खिलत व जगा व शिरपेंच येणेंप्रमाणें.
१ हसन-रजाखान वजिराचा कारभारी. यासी पाचा पारचांची खिलत, वस्त्रें, व जगा, व शिरपेंच, येणेंप्रमाणें.
१ हैदर-बेगखान वजिराचा मुत्खियार. यासी सातां पारच्यांची खिलत व जगा, शिरपेंच, येणेंप्रमाणें.
१ राजश्री सदाशिवपंत बक्षी पाटीलबावाकडील वकील. यासी पाचा पारच्यांची खिलत, वस्त्रे व जगा शिरपेंच, येणेंप्रमाणें.
५ एकूण पाच खिलत रवाना केले आहेत. व या दिवसांत हापडसाहेब इंग्रेज, पारमरसाहेबाचा बदली, होवून मेघफासनसाहेब याजकडून कलकत्त्याहून लखनऊस आला आहे म्हणून वर्तमान आहे. पुढें विशेष वर्तमान ऐकिल्यास विनंति लिहूं. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.