Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ३८.

१७०६ आषाढ वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे:- महाराव निंबाळकर याची स्त्री आनंदीबाई राजश्री पाटीलबावाची बहीण याजसमागमें नवाब निजाम-अल्लीखान यांजला खिलत, वस्त्रें सात, पारचे, व हत्ती-घोडा, व मोत्याची माळ व शिरपेंच व झगा बमय परगीरी व तरवार व ढाल येणेंप्रमाणें पातशाकडून राजश्री पाटीलबावांनीं रवाना केलें आहे. स्वामीस श्रुत होय. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.