Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ३६.

१७०६ आषाढ वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसिजे :- वाट-साहेब इंग्रजानें हैदरनाइकाचे पुत्राकडील मामला तीन कोडीवर फैसल करू मदराजचे किल्याची लढाई महकुब करविली. व मुलूक हैदरनायकाचे पुत्राने घेतला आहे तो याजकडे बदस्तूर बाहाल असावा याप्रमाणें फैसला करून, मदराज किल्यांतून कलकत्त्यास आला. मेघफाससाहेब यास फोडून वर्तमान सांगितलें. त्यांणीं उत्तर दिल्हें कीं, जे सर्वांचे मनास कबसलियांचे मनास आली ते गोष्ट आह्मांस मान्य आहे. हैदरनाइकाचे पुत्रासी सलूक कर्णेच योग्य आहे, ह्मणोन बोलण्यांत आलें आहे. व महंमद अल्लीखान, आरकाटचा सुभा, याचें पत्र कलकत्त्यास मेघफाससाहेबास आलें कीं, फौजेची व खर्चाची खबर घषता तरी हा सलूक रहातो, नाहीं तरी हैदरनाइकाचे पुत्र आल्यावर गालबा आहे, या दिवसांत खबर घेणें योग्य आहे. ह्मणोन लि॥ आहे. याप्रमाणें वर्तमान लेख लिहून आले त्याजवरून विनंति लि। आहे. बहुत काय लि।।? कृपा केली पाहिजे. हे विनंति.

सेवेसी विनंति शेवक शंकराजी सखदेव कृतानेक सां नमस्कार विज्ञापना. लिहिलें परिसोन कृपा करणार स्वामी समर्थ आहेत. हे विज्ञप्ती.