Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ३५.

१७०६ आषाढ वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे:- पातशहास मिरज्या सफीखान यांणीं विनंति केली कीं, आपण खासा स्वारी अगरियाकडे चालावें. त्यास पातशहांनीं उत्तर केलें कीं, तुह्मी एकांतएक नाहींत, या तुचे भरवशावर निघोन येखादी मसलत करून फजीत व्हावें कीं काय ? त्याजवरून रदबदली होता सिलेमासको पातशाजाद्यासमागमें द्यावें, असें ठरलें. तेव्हां पातशाहा ह्मणून लागले कीं, मसी तुह्मी अंतर करू नयें. त्यांस मर्जासफीखान व अफरा-शाहाखान व अबदुल अमदाखान व जेनुल-अहदीखान व मेहेदी-कुलीखान कुराणावर मोहोरा करून दिधल्या कीं, आम्ही हजरतीशीं अंतर करणार नाहीं. त्याचे कुराणावर पातशांनीं मोहर केली कीं, आह्मी अंतर करणार नाहीं. याप्रों परस्परें शफत प्रमाण होवून शाहाजाद्यास समागमें घेऊन गेलें. याचें कारण कीं, पातशहा सोडून दूर गेल्यावर पातशहानें दक्षण्यांसी किंवा इंग्रजांसी किंवा शिखासी जाबसाल लावूं नये. कोणाकडून आमचें पारपत्य करील ह्मणोन त्यांचे मनांत शंवशव येऊन, पातशाहाजादा आपले हातीं असावा व महंमदबेग हमदानी व राव राजा प्रतापसिंग जैपुरकर वगैरे किरकोळी राजेरजवाडे कोणी मानितात नाहींत. याजकरितां तारा समागमें असलियास सर्व आदब करून ताबेदारी करतील, हे जाणोन पातशाहाजाद्यास समागमें घेऊन गेले आहेत. आग्नियास गेलियावर महमद-बेगानें ताबेदारी केली तरी उत्तम, नाहीं तरी त्याचे पारपात्य करावें, हा एक विच्यार. व तो ताबेदारी होवून यांचे आज्ञेनरूप असल्यास, राजश्री पाटीलबावाची फौज हलकी असलियास, राव याजकडील जाबसाल लागलाच आहे. त्याप्रों राव यास सामील होवून पाटिलासी बिघाड करावा, हा एक विचार. जर पाटीलबावाची फौज भारी असली व न तोले, तरी त्याचे व पाटील याचे मध्यस्तींत पडून त्याचा यांचा सलोख करून देऊन ग्वालेरीचा किला व पहिला करार आहे. त्याप्रों मुलुक पंचमहाल वगैरे राजश्री पाटीलबावास देऊन, त्यासुधां अंतर्वेदींत उतरून, पूर्वेस लखणऊकडे चाल करावी. हा एक विचार व कोणासीही बिघाड न करितां यंदाचे साल अग्नियाचे किल्याचा व मुलुकाचा बंदोबस्त व सर्व सेवक आज्ञेंत येऊन व आपले घर रक्षून असावें. हाही एक येक विचार. असे च्यार विचार आपलें घरांत हामसिरा बेगम व घरचे कारभारी शिवराम वगैरेही ठरावून, येथून कूच करून, तोफखाना व फौजेसुद्धां गेले आहेत. त्यास, अग्नियास गेलियावर कोणती गोष्टींतून दरपेश येईल व काय मसलत करतील तें प्रत्ययास आल्यावर विनंती लिहूं. व श्रीमंतसाहेबास व आपल्यास खलितें पत्रें स्नेहवृद्धीचे नबाब अफराशाबखान यांणीं लि। आहेत. याची उत्तरें आपणही कृपा करून स्नेह-वृद्धीची पाठवावीं. बहुत काय लि ? कृपा केली पो. हे विनंति.