Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीवरद.
लेखांक ३३.
१७०३ श्रावण वद्य ११.
पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंतिपत्रीं आज्ञा कीं : सरकारांतून उमदा सरदार बमय फौज पातशहाचे हुजुरांत येऊन पातशहांनीं व सरकारचे फौजेनें मिळून अंतर्वेद, बंगाला वगैरे मोहीम मातबर करावी, ऐसे होतें. परंतु प्रस्तुत बरसात दोन चार महिने राहिली आणि इंग्रजी पलटण जमा होवून शिकरीवर आली, त्याची तंबी करणें प्राप्त आहे, याकरितां राजश्री महादजी शिंदे व शिवाजी विठ्ठल मातबर फौजेनसी इंग्रजी पलटणाचे पारपत्यास गेले आहेत. या समयांत पातशहाची हुजूर फौज दहा- बारा हजार बमय सरंजाम जंगी व एक सरदार बावकुफ याजप्रों रा। महादजी शिंदे यांजकडे येऊन मारनिले यांनीं व त्यांनीं मिळून शिकरीवर पलटणें आलीं आहेत त्यांचें पारपत्य करावें. बरसातीस चार महिने अवकाश आहे, याजसंबंधें या पलटणाचें पारपत्य करून गारत करावें, हें नेकसलाह. याजकरितां तुह्मी पातशहास व नजबखानास मसलतीचें मार्ग बोलोन, फौज इंग्रजांचे पारपत्यास लवकर ये, ऐसें करावें. बरसात जालियावर मातबर बसलत करावी. तूर्त बरसातीस थोडे दिवस राहिलिया हें काम करावें. येणेंकरून फार चांगलें आहे. म्हणून पत्रीं आज्ञा. त्यास आज्ञेप्रों पातशहास व नबाब नजबखानास समजावून उत्तेजन बहुत प्रकारें दिल्हें कीं, तुह्मी श्रीमंतास पत्रें लिहीत गेला व आह्माकडून लिहवीत गेला, आतां तुमचे लिहिलेप्रों रा। पाटीलबावा आले आहेत; त्यांचे शामील आपली फौज पाठवावी. यांनीं उत्तर केलें कीं, उगेंच आह्मास कशास लाजवितां, आह्मांपासी फौज आहे ती शिखाकडे अटकली आहे तिकडून रिकामी जालियावर श्रीमंताचे मनोदयानरूप अमलांत येईल. म्हणून बोलतात. अनुभवास येईल तो मागाहून विनंति लिहूं. इंग्रेजाकडील रु।। घेऊन त्यास शामील न जाले ते एक पातशहाचे भयानें व स्वामीचे सेवेंत वचनीं गुंतले आहेत, त्या शरमेनें आजवर राखिले आहेत. पुढें सेवकाचा पाय येथें ठरणें कठिण जालें व याजला त्याचें आश्वासन वरचेवर येतच आहेत. ते बातनी ठेवून वारंवार यासी अर्ज करितों कीं पागोटियाची आबरू सोडून टोपी घालाल तर पुर्ती टोपी बसेल. तुचे नसीबानें जुंज लागलें, नाहीं तर आजपावेतों दिल्लीत अंमल करते, आतां आपला नक्षा राखणें तर राजश्री महादजी शिंदे यांस शामील होणें, नाहीं तर आतां कळीच दाखवून पुढें ग्रास करतील तेव्हां पस्ताव कराल व आमचें बोलणें स्मराल, ते न करणें. असें प्रांत:काळ सायंकाळ नित्यानित्य तऱ्हेतऱ्हेची ममता दृढ करून उत्तेजन देत आहो. पुढें अंमलात येईल तें विनंति लिहूं. ईश्वर सत्वर शत्रूचा नाश करो व स्वामीचा प्रताप अधिकोत्तर होई ते सुघडी. कृपा केली पाहिजे. हे विनंति.